Side Effects of Eating Chewing Gum: सावधान!! च्युइंगम चघळण्याची सवय पडू शकते महागात..

बबलगममध्ये मेथॉल आणि सॉर्बिटॉल सारखे कृत्रिम गोड पदार्थ असतात जे आतड्यांना त्रास देतात आणि अतिसार होऊ शकत.
Side Effects of Eating Chewing Gum
Side Effects of Eating Chewing Gumgoogle
Updated on

मुंबई : तुम्हालाही च्युइंगम चघळण्याची सवय असेल तर काळजी घ्या. ही सवय तुम्हाला आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या मोफत देऊ शकते. जास्त प्रमाणात बबलगम खाल्ल्याने दातांचे नुकसान होऊ शकते

अनेक लोकांना ऑफिस मध्ये, रस्त्यावर फिरताना चुईंगम खाण्याची सवय असते. तासंतास त्यांच्या तोंडात च्युइंगम असते. बर्‍याच लोकांना च्युइंगमचे इतक व्यसन असतं की त्यांच्या खिशात नेहमी त्याच पॅकेट असत.

Side Effects of Eating Chewing Gum
Mutual Fund : फक्त एवढे पैसे गुंतवा आणि कमवा १३ कोटी रुपये

काहीजण तोंडाची चरबी कमी करण्यासाठी च्युइंगम खाण्याचा सल्ला देतात. पण, तुम्हाला च्युइंगम चघळण्याची सवय असेल तर आताच सावध व्हा. च्युइंगमसारख्या पदार्थांमध्ये वापरण्यात येणारे पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या सिडनी विद्यापीठातील संशोधकांच्या मते, E-171 नावाचे खाद्यपदार्थ आरोग्यासाठी हानिकारक आहे. च्युइंगमसोबत 900 हून जास्त पदार्थांमध्ये E-171 नावाचा खाद्य पदार्थ मिसळला असतो. बबलगम किंवा च्युइंगम खाल्ल्याने आपल्या शरीराला फायदा कमी होतो पण नुकसान जास्त होते.

Side Effects of Eating Chewing Gum
Expensive City : जगातील सर्वात महागडे शहर कोणते ? भारतातील शहरे कितव्या स्थानावर ?

जर एखाद्या व्यक्तीला दिवसभर च्युइंगम खाण्याची सवय असेल तर त्याचे परिणाम आणखी घातक असू शकतात.

खराब तोंड

साखरयुक्त च्युइंगम खाल्ल्याने दातांसंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे दात किडणे, पोकळी आणि हिरड्या दुखण्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

मायग्रेन

बबलगम किंवा च्युइंगमचे जास्त सेवन केल्याने डोकेदुखी होऊ शकते. बबलगम सतत चघळल्याने स्नायूंवर ताण येतो आणि यामुळे पुन्हा मायग्रेनची समस्या उद्भवू शकते.

गॅस समस्या

च्युइंगममुळे IBS (एक गंभीर पाचक समस्या) होऊ शकते. IBS हा एक जठरोगविषयक रोग आहे, ज्यामुळे पोटात अॅसिडीटी, ओटीपोटात दुखण आणि पाचक समस्या उद्भवतात.

अतिसार

बबलगममध्ये मेथॉल आणि सॉर्बिटॉल सारखे कृत्रिम गोड पदार्थ असतात जे आतड्यांना त्रास देतात आणि अतिसार होऊ शकत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.