Vastu Tips: वास्तू दोष दूर करायचे सोपे उपाय, सोबतच तुमच्या घरात असणारे दिशा दोष होतील झटपट दूर..

तुमच्या घरात काही दोष असल्यास तुमच्या आरोग्यावर त्याचा कसा विपरीत परिणाम होतो. याचीच सविस्तर माहिती आज आपण या लेखातून जाणून आहोत
Vastu Tips
Vastu Tips E Sakal
Updated on

Vastu Tips: कधी कधी तुमच्या घरातील भिंतीवरील एखादे चित्र देखील एखाद्याच्या आरोग्यात सुधारणा होण्यासाठी फायदेशीर ठरु शकतं. तुमच्या घरात काही दोष असल्यास तुमच्या आरोग्यावर त्याचा कसा विपरीत परिणाम होतो. याचीच सविस्तर माहिती आज आपण या लेखातून जाणून आहोत. वास्तुमध्ये (Vastu) पंचतत्वांचा समावेश असतो आणि चांगल्या तसेच सुरक्षिततेसाठी यात संतुलन ठेवणं गरजेचं असतं. कधी कधी तुमच्या घरातील भिंतीवरील एखादे चित्र सुध्दा एखाद्याच्या आरोग्यात सुधारणा होण्यासाठी फायदेशीर आहे. जाणून घेऊया अशा काही वास्तू टिप्स ज्यामुळे तुमच्या वास्तुतील असे दोष दूर होतील.

1) बेडरूमचं वास्तू रहस्य :

तुमची बेडरूम ही दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असावी. यामुळे मानसिक आणि शारीरिक दोन्ही गोष्टी योग्य राहतात. चुकूनही तुमची झोपण्याची खोली उत्तर किंवा पूर्व दिशेने नसावी, कारण वास्तुनुसार यामुळे वाईट आत्मा सरळ तुमच्या घरात प्रवेश करू शकतो.

नेहमी दक्षिण दिशेला डोकं करून झोपा, कारण यामुळे तुम्हाला आराम मिळेल आणि शांत झोप लागेल.

विचित्र किंवा चुकीच्या आकाराच्या अंथरूणाचा वापर करू नये, यामुळे मानसिक स्वास्थावर परिणाम होऊ शकतो.

कधीच तुमचा बेड बाथरूम च्या दरवाजा समोर नसावं, यामुळे झोपण्याच्या खोलीत नकारात्मक ऊर्जेचा संचार होईल.

2) किचन संबंधी वास्तू उपाय :

अन्न ही मुलभूत गरज असून यामुळे एखाद्या जीवाचं आरोग्य सुदृढ राहतं. दक्षिण पश्चिम दिशा आपल्या स्वयंपाकगृहासाठी अचुक आहे.

Vastu Tips
Sakal Vastu: पुण्यात घर घेताय? मग सकाळ वास्तू प्रॉपर्टी एक्सपोला नक्की भेट द्या

3) दिशेशी संबंधीत वास्तू उपाय :

सदैव आपल्या घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला मेणबत्ती पेटवून ठेवा. तसेच दरवाजाच्या समोर जर तुम्ही दिवा लावत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे लावलेल्या दिव्याचा उजेड बाहेरच्या दिशेने पडावा.

ताणतणाव, चिंता दूर करण्यासाठी जेव्हा तुम्ही कृती करत असाल तेव्हा तुमच्या चेहरा उत्तर किंवा पूर्व दिशेने ठेवावा.

आपल्या घराच्या ईशान्य दिशेला पायऱ्या किंवा स्वच्छतागृह नसावे याची काळजी घ्या. जर तुमचं बाथरूम या दिशेने असेल तर त्याचा वाईट परिणाम तुमच्या आरोग्य आणि धनसंपत्तीवर देखील होऊ शकतो.

तुमच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आरसा लावू नये कारण तो अपशकून ठरतो.

​4) झाडांशी संबंधीत उपाय :

वास्तुशास्त्रानुसार घरातल्या आतील झाडं किंवा रोपं आपल्या घरात शांतता आणि शुद्ध हवा पसरवतात. चांगलं आरोग्य आणि चिंता मुक्त जीवनासाठी तुळशीचं रोप लावावे.

तुम्हाला चांगली झोप लागावी याकरीता बेडरूम मध्ये लैवेंडर चं रोप लावू शकतात, हा सर्वात चांगला प्रकृतीचा तनाव रहीत उपाय आहे.

जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा किंवा आर्थिक समस्या उद्भवत असेल तर मेहेंदी आणि कोळीचे वनस्पती लावावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.