लग्नानंतर अनेक वर्षांनी नवरा-बायको विभक्त का होतात? जाणून घ्या कारणे

सध्या अनेक सेलिब्रिटी लग्नाला अनेक वर्ष झाल्यानंतर घटस्फोट घेताना दिसत आहेत
Divorce
Divorce
Updated on

लग्न झाल्यानंतर रोजच्या धावपळीत कशी वर्ष निघून जातात कळतही नाही. आधी दोघांचा असलेला हा संसार(Marriage) तिघांचा, झालाच तर चौघांचा होतो. जबाबदाऱ्या वाढतात. सुरूवातीला पती-पत्नी (Husband-Wife) एकमेकांना खूप वेळ देतात. पण, हळूहळू जाणवायला लागतं की हल्ली आपलं दररोज बोलणंच होत नाहीये. काहीतरी हरवल्याची जाणीव होते. एके दिवशी अचानक त्या दोघांच्यात वादाची ठिणगी पडते. रोजच्या आयुष्यात (Lifestyle) काहीतरी सुटतंय असं वाटतं. लग्नाला १०-१२ वर्षांपेक्षा जास्त झाली असली तरी आता पटू शकत नाही, असे म्हणून ते दोघं वेगळी होतात. अशाप्रकारे सध्या अनेक सेलिब्रिटी कपल्सचे घटस्फोट (Divorce) घेण्याचे प्रमाण वाढते आहे.

अभिनेता नितिश भारद्वाजने घटस्फोट घेताना किती त्रास होतो, हे मिडीयाला नुकतेच सांगितले. पण आपल्या आजूबाजूला पाहिले तर अशी अनेक जोडपी आहेत कि जी विभक्त झाली आहेत. याविषयी सायकलॉजिस्ट आणि विवाह समुपदेक गीतांजली शर्मा सांगतात की, सध्या घटस्फोटाची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. ज्यांच्या लग्नाला २० ते ३० वर्ष झाली आहेत असे नवरा-बायको विभक्त होण्याचा निर्णय घेत आहेत. त्यांनी विभक्त होण्यामागे काही कारण सांगितली आहेत.

Divorce
एकला चलो रे... लग्न न करता सिंगल राहण्याकडे तरुणाईचा वाढला कल
extramarital affair
extramarital affair esakal

विवाहबाह्य संबंध

विवाहित लोकं वेगळी होण्यामागे विवाहबाह्य संबंध हे सर्वात मोठे कारण आहे. सुरवातीला सगळेच करिअऱ आणि आपल्या आयुष्यात व्यस्त असतात. पण जसा वेळ जातो , तेव्हा त्यांना जाणवते की त्यांना आपल्या जोडीदारापेक्षा दुस-या कोणत्या तरी व्यक्तीत जास्त रस आहे. किंवा ते आपल्या जोडीदारापेक्षा दुसर्‍याशी भावनिक दृष्ट्या जोडलेले आहेत. यामुळे पती-पत्नीचे दीर्घ नातेही तुटू शकते.

Divorce
Relationship Tips : गरजेपेक्षा जास्त भावनिक आहे जोडीदार, नातं कसे टिकवावे?

जबरदस्तीने केलेलं लग्न

काही लोकं घरच्यांनी जबदरस्ती केल्याने लग्न करतात. सुरूवातीला घरातल्यांचा मान राखतात. पण जसा वेळ जातो तसा नात्यात तणाव निर्माण होतो. एकमेकांचा सहवास नकोसा होतो. अशावेळी ते वेगळं होण्याचा निर्णय घेतात.

couple
couple Esakal

एकमेकांपेक्षा वेगळे असणे

सुरूवातीला दोघेही आपाआपले करिअऱ घडवायला प्राधान्य देतात. तेव्हगा त्यांची प्रगती वेगवेगळ्या दिशेने होते. अशावेळी कोणत्याही गोष्टीकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. करिअरच्या निमित्ताने जसा बराच वेळ जातो, त्यानंतर दोघांनाही एकमेकांपासून खूप वेगळे आहोत, असे वाटायला लागते.

Divorce
Relationship Tips: नात्यासाठी सायलेंट किलर ठरू शकणाऱ्या पाच गोष्टी
Hritik Roshan s ex wife Sussanne Khan
Hritik Roshan s ex wife Sussanne Khan

मुलांमुळेच एकत्र

डॉ.गीतांजली सांगतात, लग्नानंतर अनेकांच्या नात्यात सुरुवातीपासूनच अडचणी येतात. पण मुले झाल्यावर ते सोबत राहतात. मुलांना आई-वडिलांचे प्रेम ते देतात. पण एकीकडे त्या दोघांचे पटत नसतं. मग ते मुलं १५-१६ वर्षांची झाल्यावर निर्णय घ्यायचा विचार करतात.

Divorce
घटस्फोटीत व्यक्तीच्या प्रेमात पडलात? डेटिंग करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात
couple
couple

एकमेकांकडे लक्ष न देणे

आजकाल एकमेकांसोबत बराच काळ घालवल्यावर नात्यात एकमेकांना प्रेम देणे, काळजी घेणे कमी होऊ लागले आहे. जर असे झाले तर नाते तुटण्यात वेळ लागत नाही.

Divorce
Breakup: ब्रेकअपनंतरही येतीये जोडीदाराची आठवण? फॉलो करा या टिप्स
Divorce Couple
Divorce Couple

संबंध सुधारण्याचा प्रयत्न करणे

भारतीय संस्कृतीत, जर सुरुवातीला पती-पत्नीमध्ये काही समस्या असतील तर मुले झाल्यानंतर सर्व काही ठीक होईल, असे मानले जाते. पण, अशा वेळी मुलं होऊनही पती-पत्नी नातं नीट होण्यासाठी प्रयत्न करत राहतात. पण नंतर बराच काळ गेला तरी हे घडत नाही. मग तेव्हा ते वेगळे होण्याचा निर्णय घेतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()