Skin Care : आठवड्यात फक्त दोनदा चेहऱ्यावर कच्च्या दूधाने मसाज करा, चाळीशीतही दिसाल श्वेतासारखे

तुम्हाला नॅचरली सुंदर दिसायचं असेल तर तुम्ही हा घरघुती उपाय वापरू शकता.
Skin Care
Skin Care esakal
Updated on

Skin Care : तारुण्य हे एका वयापर्यंतच टिकतं असं म्हणतात. चेहरा तरुण दिसावा म्हणून महिला वेगवेगळ्या ट्रिटमेंट्स घेत असतात. वाढत्या वयात स्त्रिया अँटीएजिंग क्रिम्स आणि बरेच ब्युटी प्रोडक्ट्स वापरतात. मात्र तुम्हाला नॅचरली सुंदर दिसायचं असेल तर तुम्ही हा घरघुती उपाय वापरू शकता.

तुम्ही वाढत्या वयात चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि फाइन लाइन्सने त्रस्त असाल कच्च्या दूधाचा फेस पॅक लावून नैसर्गिकरित्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवू शकता. दूधात असे अनेक पोषक तत्व असतात जे तुमच्या चेहऱ्याला दीर्घकाळ तरुण ठेवण्यास मदत करतात. एवढेच नव्हे तर दूध तुमच्या चेहऱ्याला आतून पोषण प्रदान करते. चला तर कच्च्या दूधाचा फेस पॅक कसा बनवायचा ते जाणून घेऊया.

कच्च्या दूधाचा फेस पॅक बनवण्यासाठी लागणारे साहित्य

२ केळी

२ चमचे मध

१ विटामिन-ई कॅप्सूल

२-३ चमचे कच्चे दूध

Skin Care
Benefits of Tulsi for Skin : तुळशीचा Face Pack लावून इतकं गोरं व्हाल की, लोकं विचारतील ‘क्या है आपकी खुबसूरती का राज!

कच्च्या दूधाचा फेस पॅक कसा बनवायचा?

कच्च्या दूधाचा फेस पॅक बनवण्यासाठी सगळ्यात आधी एक बाउल घ्या. त्यात दोन केळी चांगल्याप्रकारे मॅश करून घ्या. त्यानंतर त्यात २ चमचे मध आणि २-३ चमचे कच्चे दूध मिसळा. (Skin Care)

कच्च्या दूधाचा फेस पॅक कसा चेहऱ्यावर अप्लाय कराल?

कच्च्या दूधाचा फेस पॅक चेहऱ्यावर लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

त्यानंतर हा फेस पॅक चेहऱ्यावर चांगल्या प्रकारे लावून घ्या.

त्यानंतर त्याला १५-२० मिनिटे वाळू द्या.

त्यानंतर त्याला पाण्याने धुवून घ्या.

चांगल्या रिझल्टसाठी तुम्ही हा पॅक आठवड्यातून २-३ वेळा लावू शकता.

Skin Care
Skin Care: दिवसातून नेमकं किती वेळा चेहरा धुणे योग्य? जाणून घ्या

कच्च्या दूधाचे फायदे

कच्चे दूध स्किनला सॉफ्ट बनवते.

कच्चे दूध चेहऱ्याला डीप नरीश करते.

कच्चे दूध चेहऱ्याला लावल्याने तुमची स्कीन दीर्घकाळ तरुण दिसते. (Skin)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.