Skin Care Tips : स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी घरच्या घरी तयार करा बॉडी स्क्रब, जाणून घ्या पध्दत!

स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी या स्किन केअर टिप्स फॉलो करून पाहा
Skin Care Tips : स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी घरच्या घरी तयार करा बॉडी स्क्रब, जाणून घ्या पध्दत!
Updated on

स्ट्रेच मार्क्स कोणालाच आवडत नाहीत. पण कधी गरोदरपणानंतर तर कधी अचानक वजन वाढल्यामुळे किंवा कमी झाल्यामुळे स्ट्रेच मार्क्स दिसतात. सामान्यतः अशा परिस्थितीत लोक महागड्या क्रीम घेतात. तुम्ही नैसर्गिक मार्गाने देखील स्ट्रेच मार्क्सपासून मुक्त होऊ शकता. उदाहरणार्थ, काही बॉडी स्क्रबच्या मदतीने तुम्ही स्ट्रेच मार्क्स दिसणे कमी करू शकता.

जेव्हा तुम्ही बॉडी स्क्रब वापरता तेव्हा ते तुमच्या त्वचेला एक्सफोलिएट करते, ज्यामुळे त्वचेचे स्वरूप सुधारते. यामुळे, स्ट्रेच मार्क्स देखील कमी दिसतात आणि तुमची त्वचा अधिक सुंदर दिसते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही बॉडी स्क्रब्सबद्दल सांगत आहेत, जे स्ट्रेच मार्क्स कमी करण्यात मदत करतात.

Skin Care Tips : स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी घरच्या घरी तयार करा बॉडी स्क्रब, जाणून घ्या पध्दत!
Skin Care : हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी असे बनवा घरगुती बॉडी बटर

कॉफीपासून स्क्रब बनवा

कॉफी ब्लड फ्लो सुधारून कोलेजन प्रोडक्शनला प्रोत्साहन देते. त्याच वेळी, साखर नैसर्गिक एक्सफोलिएंट म्हणून कार्य करते आणि डेड स्किन सेल्स काढून टाकते.

आवश्यक साहित्य

१/२ कप ग्राउंड कॉफी

1/4 कप नारळ तेल

1/4 कप ब्राऊन शुगर

वापरण्याची पध्दत

सर्वप्रथम कॉफीमध्ये खोबरेल तेल घालून मिक्स करा.

आता त्यात ब्राऊन शुगर मिक्स करा.

आता तुमची त्वचा स्वच्छ करा आणि काही मिनिटे हलक्या हाताने स्क्रब करून प्रभावित भागात मसाज करा.

काही काळ असेच राहू द्या. शेवटी, पाण्याच्या मदतीने स्वच्छ करा.

कोरफड आणि साखर घालून स्क्रब बनवा

स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी कोरफड आणि साखरेपासून स्क्रब बनवता येतो. कोरफड तुमच्या त्वचेची लवचिकता सुधारते. तर साखर त्वचेला एक्सफोलिएट करते.

आवश्यक साहित्य

१/२ कप साखर

2 चमचे एलोवेरा जेल

2 चमचे बदाम तेल

वापरण्याची पद्धत

एलोवेरा जेलमध्ये बदामाचे तेल घालून मिक्स करा.

शेवटी त्यात साखर घालून स्ट्रेच मार्क्स असलेल्या भागावर लावा.

त्वचेला हलक्या हातांनी मसाज करा आणि काही वेळ तसाच राहू द्या.

त्यानंतर पाण्याच्या मदतीने त्वचा स्वच्छ करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.