Steaming Benefits: चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घेणे योग्य आहे का? जाणून घ्या योग्य पद्धत

चेहऱ्यावर पाण्याची वाफ घेणे, ही ब्युटी रुटीनमधील महत्त्वाची प्रक्रिया मानली जाते.
Steaming
Steaming sakal
Updated on

चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स येणं हे फार कॉमन आहे. वातावरणातील प्रदूषण, धूळ हे आपल्या त्वचेवर बसतात आणि त्वचेवरील छिद्रात ही घाण साचून त्या जागी ब्लॅकहेड्स तयार होतात. तेलकट त्वचा असणाऱ्यांच्या चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स जास्त असतात, कारण त्वचेवरील तेलामुळे घाण त्वचेवरच चिकटून राहते. ब्लॅकहेड्समुळे चेहरा खूप वाईट दिसू लागतो. चेहरा नियमितपणे स्वच्छ केल्याने ब्लॅकहेड्स टाळता येतात.

चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स काढण्यासाठी लोक खूप काही करतात आणि यापैकी एक युक्ती म्हणजे चेहऱ्यावर वाफ घेणे. जेव्हा ब्लॅकहेड्स असतात तेव्हा वाफ घेण्याची शिफारस केली जाते. वाफेमुळे त्वचेची छिद्रे उघडतात, पण त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स खरोखरच दूर होतील का?

वाफ घेतल्याने ब्लॅकहेड्स दूर होतात का?

वाफ घेतल्याने ब्लॅकहेड्स किंवा व्हाईटहेड्स दूर होतात असे म्हटले तर ते पूर्णपणे खरे नाही. जेव्हा तुम्ही चेहऱ्यावर वाफ घेता तेव्हा ते त्वचेची छिद्रे उघडते, रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचा हायड्रेट करते. यानंतर, ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी त्वचेची साफसफाई करावी. ओलसर त्वचेतून ब्लॅक आणि व्हाइटहेड्स सहज काढता येतात.

घरी ब्लॅकहेड्स कसे स्वच्छ करावे

  • स्किन टाईपनुसार प्रथम फेसवॉश घेऊन चेहरा स्वच्छ करा.

  • ब्लॅक किंवा व्हाईट हेड्स असलेल्या ठिकाणी स्क्रबने सर्कुलर मोशनने मसाज करा.

  • स्क्रब केलेल्या चेहऱ्यावर वाफ घ्या आणि नंतर हलक्या हाताने मसाज करा.

  • ब्लॅक हेड्स साफ केल्यानंतर चेहऱ्यावर मास्क लावा.

  • 10-15 मिनिटांनंतर मास्क काढा आणि चांगले मॉइश्चरायझर लावा.

या गोष्टींची काळजी घ्या

  • ब्लॅक हेड्स एका झटक्यात साफ करण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा चेहऱ्यावर पुरळ उठू शकतात.

  • ब्लॅक हेड काढण्यासाठी कोणतेही साधन अतिशय काळजीपूर्वक वापरले पाहिजे.

  • ब्लॅकहेड्स काढण्यासाठी स्क्रब जास्त वेगाने घासू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.