Skin Care Tips : कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या? मग 'हे' घरगुती उपाय ट्राय करून बघा

आम्ही तुम्हाला काही उपायांबद्दल सांगणार आहोत जे सुरकुत्याची समस्या कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात आणि या उपायांच्या मदतीने तुमचा चेहरा देखील चमकेल.
skin care
skin caresakal
Updated on

आपला चेहरा हा तजेलदार, पिंपल्स फ्री, सुरुकुत्या नसलेला असावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. सुरकुत्यांमुळे त्वचेची चमक निघून जाते आणि तुम्ही वृद्ध दिसू लागता. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी महिला अनेक उत्पादनांचा वापर करतात.

या उत्पादनांचा वापर करून ही समस्या कमी होत असली तरी या उत्पादनांचा वापर बंद केल्यानंतर या समस्या पुन्हा निर्माण होतात. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला काही उपायांबद्दल सांगणार आहोत जे सुरकुत्याची समस्या कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात आणि या उपायांच्या मदतीने तुमचा चेहरा देखील चमकेल.

एलोवेरा जेल

कोरफड अनेक गुणधर्मांनी समृद्ध आहे, त्यात अँटीसेप्टिक, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी असे अनेक गुणधर्म आहेत आणि हे सर्व त्वचेसाठी फायदेशीर आहेत. एलोवेरा जेल वापरल्याने सुरकुत्याची समस्या कमी होते आणि चेहऱ्यावर चमकही येते.

अशा प्रकारे वापर करा

  • थोडे एलोवेरा जेल घ्या

  • चेहऱ्यावर लावा

  • यानंतर चेहऱ्याला मसाज करा.

  • हा उपाय आठवड्यातून 3 वेळा करा.

skin care
Skin Care Tips : चेहऱ्यावर किवी लावताय? मग 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा, कारण...

अंडी

चेहऱ्यावरील सुरकुत्याची समस्या देखील अंड्याच्या मदतीने कमी केली जाऊ शकते अंड्यामध्ये अनेक जीवनसत्त्वे असतात आणि त्यामध्ये प्रोटीन देखील असते, ज्याच्या मदतीने सुरकुत्याची समस्या कमी होते. अंड्याचा वापर केल्याने चेहऱ्यावर चमकही येते.

अशा प्रकारे वापर करा

  • अंडी फोडून त्यातील पांढरा भाग बाहेर काढा.

  • नंतर चेहऱ्यावर लावा.

  • कोरडे झाल्यानंतर चेहरा स्वच्छ करा.

  • यानंतर चेहरा मॉइश्चरायझ करा.

 बदाम

बदामामुळे तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात आणि तुमची त्वचा सुदंर दिसू लागते. पाच ते सहा बदाम रात्रभर दूधात भिजत ठेवून सकाळी ते खा. यामुळे तुमच्या चेहऱ्यात फरक जाणवेल.

मध

मध त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला सुरकुत्या दूर करायच्या असतील तर चेहऱ्यावर मध लावा. सुमारे 20-30 मिनिटे हे मध चेहऱ्यावर ठेवा. यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

Related Stories

No stories found.