Skin Care : टॅनिंग होऊन हात काळे पडले? मग हे स्क्रब ट्राय करून बघा, हात होतील मऊ आणि चमकदार

हा स्क्रब हातावर लावल्याने टॅनिंग कमी होते. याने तुमचे हात पूर्वीसारखे सुंदर दिसतील.
skin care
skin caresakal
Updated on

सुंदर त्वचा सौंदर्य वाढवते. मग ते चेहऱ्याचे असो वा हातपायांचे. धूळ-माती आणि प्रदूषणामुळे तसेच घरातील कामे केल्याने हातावर घाणीचा थर साचतो. हाताच्या बोटांच्या मागील बाजूस काळेपणा दिसू लागतो.

तसेच, उन्हाळा वाढू लागला की आपली त्वचा टॅन होऊ लागते. जर तुमचे हात टॅनिंगमुळे काळे दिसायला लागले असतील तर तुम्ही घरच्या घरीच स्क्रब तयार करू शकता. हा स्क्रब हातावर लावल्याने टॅनिंग कमी होते. याने तुमचे हात पूर्वीसारखे सुंदर दिसतील.

स्क्रब बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • साखर - 1/2 कप

  • मध - 1/4 कप

  • खोबरेल तेल - 4 चमचे

  • बॉडी वॉश - 1/4 कप

  • इसेंशियल ऑइल - 2 ते 3 थेंब

skin care
Women Fashion : सर्वांमध्ये दिसायचंय हटके! लेटेस्ट डिझाइन असलेले हे इंडो-वेस्टर्न आऊटफिट एकदा ट्राय करा

असे करा तयार

  • हे करण्यासाठी तुम्हाला पिठी साखर लागेल.

  • यानंतर पिठी साखर कंटेनरमध्ये ठेवावी.

  • आता तुम्हाला त्यात मध, खोबरेल तेल आणि बॉडी वॉश मिक्स करावे लागेल.

  • सुगंधासाठी त्यात इसेंशियल ऑइल मिसळा.

  • आता हे मिश्रण नीट मिक्स करून घ्या आणि डब्यात ठेवा.

या गोष्टी लक्षात ठेवा

आठवड्यातून एकदा स्क्रब करा. जास्त केल्याने तुमच्या त्वचेवर जळजळ होऊ शकते.

हे स्क्रब जास्त काळ साठवून ठेवू नका. अन्यथा त्वचेला त्रास होतो.

स्क्रबिंग करण्यापूर्वी वॅक्सिंग करा, जेणेकरून केस तुटण्याचा धोका कमी असेल.

Related Stories

No stories found.