Korean Beauty : बदलत्या ऋतूत सुंदर, चमकदार त्वचा हवीये? मग 'या' कोरियन ब्युटी टिप्स आहेत बेस्ट

बदलत्या वातावरणानुसार केवळ आरोग्याची काळजी घेणे गरजेचे नाही तर त्वचेची खास काळजी घेणे आवश्यक आहे.
skin
skinsakal
Updated on

बदलत्या वातावरणानुसार आरोग्यासोबत त्वचेची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. जेव्हा स्किन केअरचा प्रश्न असतो तेव्हा कोरियन स्किन केअर रूटीन, कोरियन ब्युटी टिप्स आणि कोरियन स्किन केअर उत्पादनांचा उल्लेख हमखास होतो. या दिवसांबद्दल बोलायचे झाले तर, कोरियन ब्युटी हॅक्सला सर्वाधिक पसंती दिली जात आहे. चला तर मग जाणून घेऊया की कोरियन ब्युटी रूटीनच्या मदतीने आपण त्वचेला हायड्रेट कसे करू शकतो. आम्ही तुम्हाला त्वचेची काळजी घेण्याच्या सोप्या टिप्स देखील सांगणार आहोत.

या गोष्टींचा वापर करा?

  • मध

  • काकडी

  • एलोवेरा जेल

चेहऱ्यावर मध लावल्याने कोणते फायदे होतात?

  • मध चेहऱ्यावरील छिद्र साफ करण्यास मदत करते.

  • चेहऱ्याची त्वचा मऊ ठेवण्यासाठी मध खूप उपयुक्त ठरते.

  • याशिवाय ते त्वचेला मॉइश्चरायझिंग करण्यास मदत करते.

skin
Skin Care : गुलाब पाण्यात चुकूनही मिक्स करू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा होऊ शकते त्वचेचे नुकसान!

त्वचा हायड्रेटेड कशी करावी?

सर्व प्रथम एका भांड्यात २ चमचे मध टाका.

यानंतर एक काकडी बारीक करून त्यात घाला. नतंर एलोवेरा जेल यामध्ये मिक्स करा.

सर्वकाही चांगले मिसळा आणि नाकावरील ब्लॅकहेड्सवर लावा आणि मालिश करा.

साधारण ५ मिनिटे स्क्रबने नाकावर मसाज करा.

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते मसाज करण्याऐवजी चेहऱ्यावर थोडा वेळ ठेऊ शकता.

कापूस आणि पाण्याच्या मदतीने ते स्वच्छ करा.

तुम्ही हा उपाय आठवड्यातून 2 ते 3 वेळा करू शकता.

यानंतर तुम्ही चेहऱ्यावर मॉइश्चरायझर वापरू शकता.

हा उपाय सतत करून पाहिल्यास तुमच्या चेहऱ्याला योग्य हायड्रेशन मिळेल.

राईस वॉटर

राईस वॉटर म्हणजेच तांदळाचे पाणी चेहऱ्यावर अनेक प्रकारे लावता येते. हे पाणी तुम्ही फेस टोनर म्हणून लावू शकता. या पाण्याचा वापर फेस पॅक बनवण्यासाठी केला जाऊ शकतो किंवा तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी चेहरा धुण्यासाठी तांदळाचे पाणी देखील वापरू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.