Skin Care : कोरडी असो वा तेलकट, प्रत्येक त्वचेसाठी फायदेशीर ठरते मुलतानी माती... असा करा वापर

आता तुम्ही पार्लरमध्ये खर्च होणारे पैसे वाचवू शकता. यासाठी मुलतानी माती अनेक प्रकारे वापरता येते. मुलतानी मातीचे अनेक फायदे आहेत.
skin
skinsakal
Updated on

बदलत्या जीवनशैलीमुळे त्वचेमध्ये अनेक बदल दिसू लागतात. अशा स्थितीत त्वचेची चमक निघून जाते. यासाठी आपण अनेकदा पार्लरमध्ये जातो आणि त्वचेवर विविध प्रकारचे उपचार घेतो, परंतु हे फक्त 1 किंवा 2 दिवस चालतात. आता तुम्ही पार्लरमध्ये खर्च होणारे पैसे वाचवू शकता. तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये मुलतानी मातीचा वापर करू शकता. मुलतानी मातीचे अनेक फायदे आहेत.

मुलतानी मातीचा स्क्रब असा करा तयार

  • सर्व प्रथम एका भांड्यात १ काकडी बारीक करून घ्या.

  • त्यात २ चमचे मुलतानी माती घाला.

  • दोन्ही चांगले मिसळा आणि हातांच्या मदतीने चेहऱ्यावर लावा.

  • ५ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा.

  • आता कापूस आणि पाण्याच्या मदतीने फेस स्क्रब स्वच्छ करा.

skin
Skin Care : टॅनिंग होऊन हात काळे पडले? मग हे स्क्रब ट्राय करून बघा, हात होतील मऊ आणि चमकदार

मुलतानी मातीचा फेस पॅक असा करा तयार

  • मुलतानी मातीमध्ये गुलाबपाणी मिसळून फेस पॅक तयार करता येतो.

  • यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात अर्धा चमचा गुलाबपाणी १ चमचा मुलतानी माती मिसळा.

  • हे दोन्ही चांगले मिसळल्यानंतर ब्रशच्या मदतीने चेहऱ्यावर लावा.

  • फेस पॅक चेहऱ्यावर १५ मिनिटं राहू द्या.

  • आता पाण्याने चेहरा धुवून स्वच्छ करा.

  • अशाप्रकारे, त्वचेवर चमक आणण्यासाठी तुम्ही आठवड्यातून दोनदा हा उपाय करून पाहू शकता.

Related Stories

No stories found.