Face Skin Care : चेहऱ्यावर एक जरी पिंपल दिसला की आपली लगेच चिडचिड सुरु होते. चेहऱ्यावरील पिंपल्सने चेहऱ्याचं सौंदर्य गेल्यासारखं आपल्याला वाटू लागते. मात्र स्कीन स्पेशालिस्ट बदलून किंवा वेगळ्यावेगळ्या मेडिसिन्स आणि क्रिम वापरून फारसा प्रभाव पडणार नाही. कारण पिंपल्स येण्याचे कारण हे तुमच्या दैनंदिन सवयींशीदेशील निगडीत असू शकते. तेव्हा डॉक्टर नव्हे तर या 3 सवयी लगेच बदला.
चुकीच्या स्कीन केअर प्रोडक्ट्सचा वापर
त्वचा उत्पादने वापरण्यापूर्वी, आपली त्वचा तेलकट, कोरडी किंवा सामान्य आहे की नाही हे जाणून घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही त्वचेनुसार चुकीचे उत्पादन वापरत असाल तर कुठेतरी तुमची त्वचा खराब होत आहे आणि त्यातून मुरुम येऊ लागतात.
हार्मफुल मेकअप प्रोडक्टचा वापर
मेकअप चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतो म्हणून केला जातो, पण मेकअपची अनेक उत्पादने आहेत ज्यामध्ये केमिकलचे प्रमाण खूप जास्त असते. याशिवाय बराच वेळ मेकअप ठेवल्याने चेहऱ्याला ऑक्सिजन मिळत नाही आणि पिंपल्स येऊ लागतात.
चेहऱ्यासाठी चुकीचं क्लिंझर वापरणं
चेहऱ्यासाठी योग्य क्लिंझरची निवड करणे सुद्धा खूप महत्वाचे आहे. अन्यथा तुमच्या चेहऱ्याची त्वचा खराब होऊ शकते. तुम्ही फोम क्लीन्झर वापरू नये, तसेच स्किन एक्सफोलिएट करण्यासाठी क्लिन्झर वापरू नये. जर तुम्हाला परफेक्ट इफेक्ट हवा असेल तर फक्त वॉटर बेस्ड क्लिंझर लावा.
फक्त वाइप्सच्या मदतीने मेकअप रिमूव्ह करणे
वाइप्सने मेकअप रिमूव्ह करणे चुकीचे नाही पण त्यानंतर तुम्हाला फेसवॉशसुद्धा करायला हवा. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरी केमिकल्स सगळे निघून जातील. तुम्ही असे न केल्या केमिकल्स तुमच्या चेहऱ्याच्या आतील लेयमध्ये जाऊन इन्फेक्ट करु शकतात. आणि पिंपल्स वाढतील. (Skin Care)
या सवयी तुम्ही बदलल्यात तर तुमची निश्चितच पिंपल्सची समस्या कमी होईल. तेव्हा आज बदला तुमच्या सवयी. (Lifestyle)
डिस्क्लेमर - वरील लेख माहितीवर आधारलेला असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.