Skin Care Tips : चमकणारी त्वचा मिळविण्यासाठी घरी कडुलिंबाच्या मदतीने बनवा हा फेस वॉश..

Homemade Neem Face Wash : आपली त्वचा सुंदर आणि मुलायम दिसण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. बाजारातील अनेक प्रोडक्ट्सचा आपण वापर करतो.
skin care
skin caresakal
Updated on

आपली त्वचा सुंदर आणि मुलायम दिसण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. बाजारातील अनेक प्रोडक्ट्सचा आपण वापर करतो. परंतु, त्या उत्पादनामध्ये अनेक हानीकारक रसायने वापरली जातात. यामुळे आपली त्वचा अधिक खराब होते. तसेच बऱ्याचदा आपण पार्लरमध्ये जाऊन विविध गोष्टी आपल्या चेहऱ्यावर ट्राय करतो. यामुळे देखील आपली त्वचा अधिक खराब होते. यामुळे त्वचेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तुम्ही घरच्या घरी कडुलिंबाच्या मदतीने फेस वॉश बनवू शकता.

कडुलिंबामध्ये उपस्थित अँटी-बॅक्टेरियल आणि दाहक-विरोधी गुणधर्म आपली त्वचा क्लीयर करण्यात मदत करतात. याव्यतिरिक्त, कडुलिंब अँटिऑक्सिडेंट्स समृद्ध आहे, ज्यामुळे आपली त्वचा अधिक निरोगी आणि तरूण बनते. तुम्हाला कदाचित माहित नसेल, परंतु कडुलिंबामध्ये उपस्थित फॅटी ॲसिड्स आणि व्हिटॅमिन ई त्वचेला मॉइश्चरायझ करण्यात मदत करते. कडुनिंब त्वचा खोलवर साफ करण्यास उपयुक्त आहे, म्हणून त्याच्या मदतीने फेस वॉश बनवणे ही चांगली कल्पना आहे.

skin care
Monsoon Skin Care Tips : पावसाळ्यात त्वचा तेलकट आणि चिकट होतेय? मग या टिप्स नक्की फॉलो करा...

कडुलिंब आणि दहीपासून बनवा फेस वॉश

कडुलिंब आपली त्वचा डीटॉक्सिफाई करते आणि कोणत्याही प्रकारच्या संसर्गास प्रतिबंधित करते. त्याच वेळी, दहीमध्ये लॅक्टिक ॲसिड असते. मध त्वचा ओलसर बनवते.

फेस वॉश बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • 2 चमचे कडुलिंब पावडर

  • 2 चमचे दही

  • 1 चमचे मध

फेस वॉश बनवण्याची पद्धत

  • सर्वप्रथम कडुलिंब पावडर, दही आणि मध एका वाटीत मिसळा.

  • हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावा आणि 10-15 मिनिटे तसेच ठेवा.

  • शेवटी, कोमट पाण्याने चेहरा धुवा.

कडुलिंब आणि मुलतानी मातीपासून बनवा फेस वॉश

जर आपली त्वचा तेलकट असेल तर आपण कडुलिंब आणि मुलतानी मातीच्या मदतीने फेस वॉश बनवून वापरू शकता. कडुनिंब आपली त्वचा स्वच्छ करण्यात मदत करेल.

फेस वॉश बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • 2 चमचे कडुलिंब पावडर

  • 2 चमचे मुलतानी माती

  • गुलाब पाणी

फेस वॉश बनवण्याची पद्धत

  • सर्व प्रथम, कडुलिंब पावडर आणि मुलतानी माती एका वाटीत टाका आणि मिक्स करा.

  • आता गुलाबाचे पाणी टाका आणि पेस्ट बनवा.

  • आपल्या चेहऱ्यावर तयार पेस्ट लावा आणि ते कोरडे होऊ द्या.

  • शेवटी, चेहरा थंड पाण्याने धुवा.

Shabda kode:

Related Stories

No stories found.