Summer Skin Care: सनबर्नपासून असं करा चेहऱ्याचं संरक्षण

उन्हाळ्यात खास करून घरातून बाहेर पडताना उन्हाळ्यात विशेष काळजी घेतल्यास सनबर्नपासून संरक्षण नक्कीच होवू शकतं.
Summer Skin Care
Summer Skin CareEsakal
Updated on

Summer Skin Care: उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वाढत्या उन्हात त्वचेची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. उन्हामुळे त्वचेशी संबंधित विविध समस्या निर्माण होतात. खास करून नाजूक त्वचा असलेल्यांसाठी उन्हाळा खूपच त्रासदायक असतो. अनेकांचा चेहरा उन्हाने लाल होतो. Skin Care Tips in Marathi How to Protect from Sunburn

अनेकदा सनबर्न Sun Burn किंना अॅलर्जीची समस्या त्रास देऊ लागते. यावेळी नेमकं काय करावं हे सुचत नाही. जळजळ अधिक झाल्यास चेहरा साबणाने Soap किंवा फेसवॉशने धुण्याची इच्छा देखील होत नाही.

यासाठी उन्हाळ्यात Summer तुम्हाला स्किन केअर रुटीनमध्ये थोडा बदल करणं गरजेचं आहे. 

उन्हाळ्यात खास करून घरातून बाहेर पडताना उन्हाळ्यात विशेष काळजी घेतल्यास सनबर्नपासून संरक्षण नक्कीच होवू शकतं.

१. घराबाहेर जाताना चेहरा झाका- सनबर्नपासून वाचण्याचा सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे चेहरा झाकणं. यासाठी एखाद्या सुती स्कार्फने संपूर्ण चेहऱ्याला झाकल्यास किंवा स्कार्फ गुंडाळल्यास सुर्याच्या किरणांपासून चेहऱ्याचं रक्षण होवू शकतं.

तसचं तुम्ही एखादी टोपी किंवा हॅट देखील बाहेर पडताना वापरू शकता. याच सोबत छत्री बाळगणं हा देखील एक चांगला पर्याय आहे. यामुळे चेहऱ्यासोबत संपूर्ण शरीराचं उन्हाच्या तडाख्यापासून संरक्षण होईल.

२. सनस्क्रीनचा वापर- सनबर्नपासून वाचण्यासाठी सनस्क्रीम हा देखल एक उत्तम पर्याय आहे. उन्हाळ्यात घराबाहेर पडताना चेहऱ्याला सनस्क्रीम नक्की लावा.

घराबाहेर पडताना २० मिनिटे आधी  सनस्क्रीम लावावे. यामुळे सुर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेच रक्षण होण्यास मदत होते. यामुळे त्वचा लाल होणं आणि काळवंडण्यापासून बचाव होतो.

३. ऍलोव्हेरा आणि गुलाब जेल-  ऍलोवेरा आणि गुलाबपाणी एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्याला थंडावा मिळतो. यामुळे चेहरा हायड्रेट राहून चेहऱ्यातील हायड्रेशन वाढवण्यास मदत होते. ऍलोवेरा आणि गुलाब पाण्यामुळे चेहऱ्यावरील बारिक पुरळ आणि सनडॅमेजपासून त्वचेचं संरक्षण होतं.

हे देखिल वाचा-

Summer Skin Care
Summer Health Tips: उन्हाळ्यात खडीसाखर बडिशेप म्हणजे आरोग्याचा खजाना

४.मध- त्वचेसंबंधित समस्या दूर करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मधाचा वापर केला जातोय. मधामध्ये असलेल्या अँटी-इफ्लेमेटरी गुणांमुळे त्वचेवरील लालपणा आणि सूज कमी होण्यास मदत होते.

तसंच त्वचेवरील रॅश आणि खाज कमी करण्यासाठी देखील मधाचा वापर उपयुक्त ठरतो. चेहऱ्यावरील लालसरपणा कमी करण्यासाठी प्रभावित भागात थोडं मध लावा त्यानंतर १५-२० मिनिटांनी चेहरा धुवा. तुम्ही दिवसातून २ ते ३ वेळा चेहऱ्याला मध लावू शकता. 

४. दही- उन्हाळ्यात आपण थंड लस्सी किंवा ताक पिऊन पोट गार ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याच प्रमाणे चेहऱ्यासाठी देखील दह्याचा वापर फायदेशीर ठरू शकतो. दह्यामुळे त्वचा सॉफ्ट होते आणि चेहऱ्यावर ग्लो येतो. चेहऱ्यावर थंड दही लावल्यास आराम मिळतो आणि त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. 

५. नारळाचे तेल- नारळाच्या तेलामध्ये अँटी-फंगल आणि अँटी- इंफ्लमेटरी गुण असतात. त्यामुळे त्वचेवरील ऍलर्जी आणि रेडनेस दूर करण्यासाठी नारळाचं तेल मदत करत. उन्हामुळे चेहऱ्यावर लाल चट्टे आले असतील तर या चट्ट्यांवर नारळाचं तेल लावावं. त्यानंतर अर्धा तासाने चेहरा धुवावा.

६. मुलतानी माती- गरमीच्या दिवसांमध्ये चेहऱ्याला दिवसातून एकदा तरी मुलतानी मातीचा लेप लावावा. यामुळे चेहऱ्यावरील मुरूम कमी होण्यास मदत होईल तसचं त्वचा देखील उजळेल.

मुलतानी माती अतिशय थंड असते. त्यामुळे चेहऱ्यावरील रेडनेस आणि आग कमी करण्यासाठी ती उपयोगी ठरते. तसचं मुलतानी मातीच्या फेसपॅकमुळे चेहऱ्यावर ग्लो टिकून राहतो. 

७. सुती कपडे घाला- उन्हाळ्यात घराबाहेर पडताना सनबर्नपासून वाचण्यासाठी कपड्यांचा देखील विचार करणं गरजेचं आहे. घराबाहेर पडताना गडद रंगाचे कपडे न घालता फिक्या रंगाचे कपडे परिधान करा.

त्याच जाड आणि टेरिकॉट किंवा मिस्क ब्लेंडचं कापड परिधान करण्याएवडी सुती कपडे घाला.

अशा प्रकारे काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही उन्हाळ्यात सनबर्नपासून त्वचेचं रक्षण करू शकता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.