Skin Care Tips : चेहरा काळवंडलाय, टॅनिंग झालंय?, बटाटा- कोरफड चेहऱ्यावर लावा कमाल बघा

त्वचेच्या कोणत्या समस्या दूर होतील?
Skin Care Tips
Skin Care Tips esakal
Updated on

Skin Care Tips : जर तुम्ही चेहऱ्याच्या अनेक समस्यांनी त्रस्त असाल तर तुम्ही कोरफड आणि बटाट्याचा रस एकत्र मिसळून त्वचेवर लावू शकता. हे दोन्ही त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकतात. अशावेळी त्वचेला अनेक समस्यांपासून दूर ठेवण्यासाठी या दोघांचे मिश्रण उपयुक्त ठरू शकते.

स्वयंपाकघरातील पाककृतींसाठी बटाटा सर्वसमावेशक मानला जातो. कारण काही लोक कोणत्याही प्रकारच्या भाजी, आमटी, डाळी, इत्यादी पदार्थांमध्ये बटाट्याचा आवर्जून वापर करतात. चवीव्यतिरिक्त बटाट्यामध्ये पोषण तत्त्वांचा खजिना आहे. यामुळे कोणत्याही प्रकारच्या भाजीमध्ये बटाटा मिक्स केल्यास, भाजी अधिक स्वादिष्ट होते.

असा हा गुणकारी चवदार बटाटा तुमच्या चेहऱ्यासाठीही फायदेशीर आहे. चेहऱ्यावरील टॅन, आणि सनबर्न, किंवा डाग घालवण्यासाठी बटाट्याचा रस लावू शकता.

Skin Care Tips
Skin Care: सन टॅन दूर करण्यासाठी कोरफडीचा या प्रकारे करा वापर, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक चमक

त्वचेच्या कोणत्या समस्या दूर होतील?

जर तुम्ही चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषांमुळे त्रस्त असाल तर तुम्ही कोरफड आणि बटाट्याचा रस त्वचेवर लावू शकता. कोरफड आणि बटाट्याचा रस केवळ वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यास उपयुक्त ठरू शकत नाही, तर हे दोन्ही त्वचेवर लावल्यास वृद्धत्वाची लक्षणेही बर् याच प्रमाणात कमी होऊ शकतात.

बटाटा आणि कोरफड

बटाट्याचा रस आणि कोरफड देखील डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. अशावेळी चेहऱ्यावरील काळी वर्तुळे दूर करायची असतील तर कोरफड आणि बटाट्याचा रस एकत्र मिसळून त्वचेवर लावू शकता. बटाट्याच्या रसामध्ये राइबोफ्लेविन आणि व्हिटॅमिन बी पोषक घटक आढळतात, जे चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

Skin Care Tips
Skin Care: उन्हाळ्यात मेकअप करण्यापूर्वी या 4 गोष्टी ठेवा लक्षात

जर तुम्हाला चेहऱ्यावर सनबर्नचा त्रास होत असेल तर तुम्ही कोरफड आणि बटाट्याचा रस मिसळून त्वचेवर लावू शकता. कोरफडीचा वापर त्वचेला थंड ठेवण्यासाठी तसेच सनबर्नची समस्या दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो. कोरफडच्या वापरामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो आणि त्वचेच्या रंगावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

बटाट्याचा रस आणि दही

बटाट्यासोबत दही वापरल्यास दुहेरी फायदे मिळू शकतात. या दोन्हीची ही रेसिपी त्वचा हायड्रेट ठेवेल आणि अतिरिक्त तेल देखील शोषून घेईल. एका भांड्यात थोडं दही घ्या आणि त्यात तीन चमचे बटाट्याचा रस घाला. चिमूटभर हळद मिसळल्यानंतर ब्रशने त्वचेवर लावा आणि १५ मिनिटांनी चेहरा धुवा.

Skin Care Tips
Skin Care: टॅनिंगच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

बटाटा आणि मध

कच्च्या बटाट्यासह आपण त्वचेवर मध देखील लावू शकता. या फेस पॅकमुळे त्वचेवरील दुर्गंध, धूळ-मातीचे कण स्वच्छ होतील आणि त्वचेला ओलावा मिळेल. फेस पॅक तयार करण्यासाठी बटाटा किसून त्याचा पल्प तयार करा. आता बटाट्याचा पल्प हातावर घ्या आणि चेहऱ्याचा मसाज करा.

तांदूळ आणि बटाटे

तांदूळ त्वचेच्या काळजीमध्येही सर्वोत्तम मानला जातो. तुम्हाला फक्त तांदूळ आणि बटाट्याचा रस एकत्र करून चेहऱ्यावर लावायचा आहे. यासाठी एका भांड्यात तांदूळ उकळून त्यातील पाणी काढून टाकावे. ते थंड झाल्यावर त्यात बटाट्याचा रस घालून कापसाच्या मदतीने त्वचेवर लावा. हा फेस मास्क लवकर सुकतो, त्यामुळे एका वेळी तीन वेळा चेहऱ्यावर लावा. आता सामान्य पाण्याने चेहरा धुवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.