Side Effects Of Lipstick : चेहऱ्यावर ब्लशच्या ऐवजी लिपस्टिकचा वापर करताय? मग, जाणून घ्या 'हे' दुष्परिणाम

Side Effects Of Lipstick : अनेकदा महिला ब्लशच्या ऐवजी लिपस्टिकचा वापर करतात. परंतु, यामुळे, चेहऱ्यावरील समस्या वाढू शकतात.
Side Effects Of Lipstick
Side Effects Of Lipstickesakal
Updated on

Side Effects Of Lipstick : मेकअप हा महिलांचा अतिशय जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचा विषय आहे. असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. मागील काही वर्षांपासून मेकअप, कॉस्मेटिक्स आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये झालेले आधुनिक बदल यामुळे महिलावर्गाचा या सर्व गोष्टींकडे कल वाढला आहे. कोणत्याही कार्यक्रमाला जाताना, लग्नात, पार्टीला किंवा अगदी ऑफिसला जाताना ही मेकअप करण्याला प्राधान्य दिले जाते.

मेकअपमध्ये अनेक प्रकारच्या उत्पादनांचा समावेश असतो. या उत्पादनांपैकी एक असलेली लिपस्टिक ओठांचे सौंदर्य वाढवते, यामुळे चेहरा खुलून दिसण्यास मदत होते. अनेकदा महिला ब्लशच्या ऐवजी लिपस्टिकचा वापर करतात.

आयशॅडो म्हणून ही लिपस्टिकचा वापर केला जातो. परंतु, असे करणे चुकीचे आहे. लिपस्टिकचा वापर ब्लशच्याऐवजी केल्याने त्वचेचे नुकसान होऊ शकते. त्याचा त्वचेवर परिणाम देखील होऊ शकतो. चेहऱ्यावर ब्लशच्याऐवजी लिपस्टिकचा वापर केल्याने काय नुकसान होऊ शकते जाणून घेऊयात.

Side Effects Of Lipstick
Lipsticks: उन्हाळ्यात लिपस्टिक फ्रिजमध्ये ठेवणे योग्य आहे का? जाणून घ्या ब्युटी हॅक्स

ब्लशच्या ऐवजी लिपस्टिकचा वापर करू नका

इन्स्टाग्रामवरील रिल्सवर किंवा युट्यूबवरील व्हिडिओंमध्ये तुम्ही अनेकदा हा पॉकेटफ्रेंडली हॅक पाहिला असेल की, काही महिला ब्लशर म्हणून लिपस्टिकचा वापर करतात. परंतु, हे अत्यंत चुकीचे आहे. सर्वच लिपस्टिक या ब्लश किंवा आयशॅडो म्हणून काम करू शकत नाही.

हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. यासंदर्भात तज्ज्ञांचे असे ही मत आहे की, ब्लशच्या ऐवजी लिपस्टिकचा वापर करणे चुकीचे आहे. कारण, हे त्वचेसाठी घातक ठरू शकते. यामुळे, त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

चेहऱ्यावर ब्लशच्याऐवजी लिपस्टिक लावल्याने होणारे नुकसान

कोरडेपणा

लिपस्टिकच्या उत्पादनांमध्ये ओठांसाठी योग्य असणारे मॉईश्चरायझिंग घटक असतात. परंतु, हे घटक चेहऱ्यावरील इतर भागांना योग्य मॉईश्चर किंवा हायड्रेशन देऊ शकत नाही. ज्यामुळे, त्वचा कोरडी पडू शकते.

अ‍ॅलर्जी

जर तुम्हाला ओठांच्या उत्पादनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही घटकांची अ‍ॅलर्जी असेल तर, तुम्ही लिपस्टिकचा चेहऱ्यावर वापर करणे टाळायला हवे. कारण, जर तुम्ही लिपस्टिकचा वापर चेहऱ्यावर केला तर चेहऱ्यावर अ‍ॅलर्जी होऊ शकते. ज्यामुळे, चेहऱ्यावर खाज येणे, लाल रॅशेस येणे किंवा सूज देखील येऊ शकते.

चेहऱ्याची जळजळ होणे

लिपस्टिकच्या उत्पादनांमध्ये सुंगधी द्रव्ये, विशिष्ट रंग किंवा इतर घटक वापरले जातात. ही उत्पादने केवळ ओठांच्या दृष्टिकोनातून बनवली जातात. त्यामुळे, लिपस्टिकचा वापर चेहऱ्यावर केल्यास संवेदनशील त्वचा असणाऱ्यांना त्रास होऊ शकतो. जसे की, डोळ्यांजवळ आग होणे, गालांवर रॅशेस येणे, चेहऱ्यावर आग होणे इत्यादी.

Side Effects Of Lipstick
Skin Care Tips : चेहऱ्यावर जायफळ लावण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहेत का?

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.