Makhana Face Pack : चमकदार त्वचेसाठी चेहऱ्यावर लावा मखाना फेस पॅक, कसे बनवायचे ते जाणून घ्या

Skin Care Tips : तुम्हाला माहित आहे का की मखाना केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे.
Makhana Face Pack
Makhana Face Packsakal
Updated on

आपण सुंदर दिसावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी आपण अनेकदा वेगवेगळे प्रोडक्ट वापरतो. अनेक वेळा असे घडते की आपण महागडे उपचार घेतो, त्याचा परिणाम काही काळ चेहऱ्यावर दिसून येतो. यानंतर त्वचा पुन्हा पूर्वीसारखी दिसू लागते. अशा परिस्थितीत, आपण घरगुती उपाय करून पाहणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला माहित आहे का की मखाना केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. याच्या नियमित वापराने त्वचेवर चमक येते. चला जाणून घेऊया मखाना फेस पॅक बनवण्याची पद्धत आणि त्याचे फायदे..

मखाना मास्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • मखाना भाजून घ्या - अर्धी वाटी

  • नारळाचे दूध - अर्धा कप

Makhana Face Pack
Skin Care Tips : फक्त 5 रुपयांत डोक्यापासून पायापर्यंत खुलवा आपलं सौंदर्य; 'हे' आहेत 3 घरगुती रामबाण उपाय

असे करा तयार

मखानाचा मास्क बनवण्यासाठी सर्व प्रथम मखानाला चांगले भाजून घ्या.

आता ते मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्या.

यानंतर त्यात नारळाचे दूध घालून 30 मिनिटे भिजत ठेवा म्हणजे ते मऊ होईल.

तसेच तुम्ही त्याऐवजी तांदळाचे पाणी वापरू शकता.

यानंतर ते चेहऱ्यावर लावा.

सुमारे 20 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या.

यानंतर, मऊ टॉवेलने चेहरा स्वच्छ करा.

यामुळे तुमची त्वचा निरोगी राहील आणि चमकदार दिसेल.

मखाना मास्कचे फायदे

मखाना त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी चांगला आहे. यामध्ये झिंक, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात जे त्वचेसाठी चांगले असतात.

तांदळाचे पाणी चेहऱ्यासाठीही चांगले असते. याचे कारण असे की त्यात अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जे त्वचेचे पोषण करतात, हे चेहऱ्याला हायड्रेट करतात आणि चमकदार बनवतात.

नारळाचे दूध त्वचेसाठी चांगले मानले जाते. हे व्हिटॅमिन सी, ई आणि के चा चांगला स्रोत आहे. यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, ज्यामुळे त्वचेला नुकसान होण्यापासून वाचवता येते. म्हणूनच तुम्ही ते देखील वापरू शकता.

Shabda kode:

Related Stories

No stories found.