Forehead Pimples: कपाळावरील पिंपल्स काही केल्या जाईना? मग 'या' टिप्स करा फॉलो

कपाळावर मुरुम येण्याची समस्या टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
skin care
skin caresakal
Updated on

कपाळावरील मुरुमांच्या समस्येने महिलांना खूप त्रास होतो. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी महिला अनेक उत्पादनांचा वापर करतात आणि अनेक उपायही करतात. कपाळावर मुरुम येण्याची समस्या टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अशा प्रकारची हेअरस्टाईल करणे टाळा

तज्ज्ञांच्या मते, चुकीच्या हेअरस्टाइलमुळे कपाळावर मुरुमांची समस्या उद्भवते. जर तुम्ही तुमचे केस पुढच्या बाजूला ठेवत असाल तर या हेअरस्टाइलमुळे कपाळावर मुरुम येऊ शकतात आणि या कारणास्तव तुम्ही अशा प्रकारची हेअरस्टाईल करणे टाळावे.

skin care
Monsoon Special Hairstyles : पावसाळ्यात कूल अन् आकर्षक दिसायचेय? मग, ट्राय करा ‘या’ सोप्या हेअरस्टाईल्स

कंडिशनर पूर्णपणे स्वच्छ करा

कंडिशनर वापरल्यानेही या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्ही कंडिशनर वापरत असाल तर या काळात तुम्ही हे लक्षात ठेवावे की जेव्हाही तुम्ही कंडिशनर वापराल तेव्हा चेहरा आणि कपाळापासून कंडिशनर पूर्णपणे स्वच्छ करा.

तज्ञांच्या मते, स्कॅल्पसाठी अँटी डँड्रफ शॅम्पू वापरा आणि कपाळावर फेस येण्यापासून देखील टाळा. त्याचबरोबर या शॅम्पूचा वापर केल्याने कपाळावरील मुरुमांची समस्या कमी होऊ शकते.

तज्ञांची मदत घ्या

ही समस्या कायम राहिल्यास तुम्ही त्वचारोगतज्ज्ञांची मदत घेऊ शकता.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()