Glowing Skin Tips: चेहऱ्यावर झटपट ग्लो हवाय? मग ट्राय करा हे फेसपॅक

चेहरा चमकदार दिसण्यासाठी अनेकजणी वेगवेगळ्या क्रिम किंवा सिरमचा वापर करतात.
skincare
skincaresakal
Updated on

चेहेऱ्यावर कोणतेही डाग किंवा सुरकुत्या नसाव्या आणि चेहरा कायमच फ्रेश आणि चमकदार दिसावा असं प्रत्येकीलाच वाटतं. चेहरा चमकदार दिसण्यासाठी अनेकजणी वेगवेगळ्या क्रिम किंवा सिरमचा वापर करतात.

मात्र अनेकदा या क्रिममधील केमिकल्समुळे चेहरा तात्पुरता उजळतो किंवा डाग नाहीसे होत असले तरी काही काळाने त्याचे त्वचेवर विपरीत परिणाम दिसू लागतात.

आपण विचार करतो की पार्लर ला जाऊन फेशियल केलं तर यातून सुटका होईल तसा याने फरक दिसतो पण खरतर कोणतंही केमिकल हे चेहऱ्यासाठी घातक असते. अशात काय करावं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना?

कोणत्याही महागड्या आणि घातक पार्लर ट्रीटमेंट घेण्याऐवजी ट्राय करा हे घरीच बनवलेले फेस पॅक

skincare
Friendship Day 2023: 'फ्रेंडशिप डे'च्या दिवशी गर्ल गॅंगसोबत फिरून या राजस्थानमधील हे ठिकाणं

1. पपई फेस पॅक

पपई मध्ये व्हिटॅमिन ए चे गुणधर्म आढळतात; त्वचा मॉइश्चराईझ होते आणि टॅनिंग पण कमी होते. पपईच्या गरामध्ये गुलाबजल टाकून पेस्ट तयार करून घ्या आणि मग चेहऱ्यावर तो फेसपॅक लावा. 15 ते 20 मिनिट राहूद्या आणि मग चेहरा पाण्याने धुवून घ्या.

2. कॉफी फेस पॅक

कॉफीमध्ये अनेक अँटिऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे रिंकल्स येत नाहीत; शिवाय चेहराही तजेलदार दिसतो. कॉफी मध्ये थोडं गुलाबजल किंवा दूध टाकून फेसपॅक बनवू शकता आणि तो चेहऱ्याला लावू शकता.

3. मुलतानी माती फेस पॅक

मुलतानी माती फेस पॅकमध्ये मॉइश्चरायझिंग आणि रींकल्स पासून वाचण्याचे गुणधर्म आहेत. मुलतानी मातीमध्ये खोबरेल तेल मिसळून फेस पॅक तयार करा. आणि नंतर तो फेसपॅक चेहऱ्यावर लावा.

skincare
Relationship Tips : पुरुषांच्या ‘या’ वाईट सवयी महिलांना नाही आवडत, लगेचच करा सुधारणा अन्यथा…

4. जास्वंदाचा फेस पॅक

रींकल्स आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांमुळे, जास्वंदाचा फेस पॅक लावल्याने स्किन एजिंगची लक्षण खूप कमी होतात. जास्वंदाची पेस्ट बनवून घ्या त्यात 2 चमचे बेसन आणि 2 चमचे दही टाकून छान मिक्स करा आणि तो चेहऱ्याला लावा.

5. डाळिंबाचा फेस पॅक

डालिंबामध्ये प्युनिक अॅसिड आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड असते. त्याचा फेसपॅक लावल्याने त्वचेची आर्द्रता टिकून राहते. डाळिंबाचे दाणे बारीक करून त्यात मध मिसळून चेहऱ्याला लावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.