Skin Care: चिमूटभर हळदीमुळे दूर होतील चेहऱ्यावरील मुरुम आणि डाग

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी अनेकजण मेकअप करतात.
skin
skinsakal
Updated on

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी अनेकजण मेकअप करतात. काहीजण ते काढून टाकण्यासाठी रसायनयुक्त फेस क्रीम आणि सीरम वापरतात. या गोष्टी महाग आहेत तसंच त्यांचा त्वचेवर दीर्घकाळ कोणताही परिणाम होत नाही. अशा परिस्थितीत चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी तुम्ही हळदीचाही वापर करू शकता. हळद तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणते.

चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी तुम्ही हळदीचा अनेक प्रकारे वापर करू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येईल. चला जाणून घेऊया चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी हळदीचा वापर कोणत्या प्रकारे करू शकता.

skin
Health Tips: महिलांनो मखाना खाण्याचे आरोग्यदायी फायदे; जरुर वाचा...

लिंबू आणि हळद

लिंबाचा रस आणि हळद मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. हळद आणि लिंबाची पेस्ट त्वचेवर कोरडे होईपर्यंत ठेवा. काही वेळाने त्वचा साध्या पाण्याने धुवा. तुम्ही हळद आणि लिंबाची पेस्ट आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरू शकता.

हळद आणि दही

त्वचेसाठी तुम्ही हळद आणि दही देखील वापरू शकता. यासाठी २ चमचे दह्यात हळद मिसळा. ही पेस्ट काळ्या डागांवर लावा. 20 मिनिटांनंतर त्वचेला हळूवारपणे मालिश करा. यानंतर ते स्वच्छ करा.

skin
Monsoon Disease : घरात पावसाचं पाणी शिरताच होऊ शकतात हे 11 आजार, हेल्दी राहाण्यासाठी या गोष्टी खा

हळद आणि मध

एक चमचा मधात चिमूटभर हळद मिसळा. दोन्ही मिक्स करून पेस्ट बनवा. हळद आणि मधाची पेस्ट त्वचेवर आणि चेहऱ्यावर 20 मिनिटे लावा. आता ते साध्या पाण्याने धुवा. मधामुळे तुमची त्वचाही मुलायम होते.

हळद आणि टोमॅटो

त्वचेसाठी तुम्ही हळद आणि टोमॅटोची पेस्ट वापरू शकता. यासाठी टोमॅटोच्या रसात चिमूटभर हळद मिसळा. हे दोन्ही मिक्स करून फेस पॅक म्हणून वापरा. जर ही पेस्ट घट्ट झाली असेल तर तुम्ही त्यात साधे पाणी देखील घालू शकता.

हळद आणि टोमॅटोची पेस्ट त्वचेवर 10 मिनिटे लावा. त्यानंतर ते त्वचेतून काढून टाका. हळद आणि टोमॅटोची ही पेस्ट तुमच्या त्वचेवरील डाग हलके करण्यासाठी काम करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.