Skin Lightening Face Mask: त्वचा उजळण्यासाठी झेंडूचे फूल चेहऱ्यावर लावा, असा बनवा फेस पॅक

चेहऱ्याला उजळवणारा झेंडूच्या फुलांचा फेस पॅक कसा बनवायचा?
Skin Lightening Face Mask
Skin Lightening Face Maskesakal
Updated on

Skin Lightening Face Mask :सध्या आपण सगळे कडक उन्हाळा अनुभवतोय. याकाळात त्वचेची आणि आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण तीव्र उन्हामुळे आपल्या शरीराला आणि आरोग्याला काही त्रास होण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात त्वचा आणि शरीर हायड्रेट ठेवणे आवश्यक असते. कारण यावर आपल्या शरीराची इको सिस्टिम अवलंबून असते.

यासाठी तुम्ही विविध प्रकारे त्वचेची काळजी घेवू शकता. तसेच उन्हाळ्यात काही प्रमाणात तुमच्या आहारात बदल करणेही गरजेचे असते. याकाळात शरीरात गारवा असणे आवश्यक आहे. अन्यथा अनेकांना काही त्रासांना सामारे जावे लागते.

तीव्र उन्हामुळे त्वचा लाल होते, काळी पडते, कोरडी होते आणि निस्तेज दिसू लागते. शरीरातील उष्णता वाढल्यामुळे अनेकांना घामुळे येणे, त्वचेवर पुरळ येणे ह्यांसारखे त्रास होतात, तर काहींना सनबर्नचा त्रास होतो ज्यामधे त्वचेवर काळे डाग पडतात, खाज येते, व सूज येते.

बर्‍याच लोकांना उन्हाळ्यामध्ये मुरूमांचा त्रास होतो. हे सगळे विकार टाळण्यासाठी व उन्हाळ्यातही त्वचेचा तजेला टिकवण्यासाठी एक खास फेसपॅक तुम्हाला मदत करू शकतो.

Skin Lightening Face Mask
Men Skin Care : हँडसम चेहऱ्यासाठी खास टिप्स, मुलींची नजर हटणार नाही

महागड्या सौंदर्य उत्पादनांपासून ते उपचारापर्यंत. पण तुम्हाला माहित आहे का की चेहऱ्यावर झेंडूच्या फुलाचा वापर करून तुम्ही चमकदार त्वचा मिळवू शकता? नसेल तर आज आम्ही तुमच्यासाठी झेंडूच्या फुलांचा फेस पॅक घेऊन आलो आहोत. झेंडूच्या फुलांचा फेस पॅक हळद आणि दहीच्या मदतीने तयार केला जातो.

झेंडू त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते. हळदीमध्ये बॅक्टेरियाचे गुणधर्म असतात जे त्वचा सुधारण्यासाठी उपयुक्त असतात. दही मृत त्वचा काढून टाकण्यासारखे कार्य करते, ज्यामुळे तुमची त्वचा चमकदार दिसते, चला जाणून घेऊया (झेंडूच्या फुलाचा फेस पॅक कसा बनवायचा) झेंडूच्या फुलाचा फेस पॅक कसा बनवायचा.

Skin Lightening Face Mask
Bottle Gourd Face Pack: काळवंडलेल्या त्वचेसाठी पार्लरला जाऊन कंटाळलात? तर एकदा दुधीचा फेसपॅक लावून बघा, नक्की फरक पडेल

झेंडूच्या फुलांचा फेस पॅक बनवण्यासाठी लागणारे साहित्य-

  • झेंडूची फुले

  • दही ½ टीस्पून

  • हळद 1 चिमूटभर

झेंडूच्या फुलांचा फेस पॅक कसा बनवायचा?

  • झेंडूच्या फुलांचा फेस पॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम फुले घ्या.

  • फुले पाण्याने नीट धुवा.

  • यानंतर फुले तोडून मिक्सरमध्ये टाकून बारीक करा.

  • नंतर त्यात दीड चमचे दही आणि चिमूटभर हळद घाला.

  • यानंतर या सर्व गोष्टी नीट मिक्स करून घट्ट पेस्ट बनवा.

  • चमकणाऱ्या त्वचेसाठी आता तुमचा झेंडूच्या फुलांचा फेस पॅक तयार आहे.

Skin Lightening Face Mask
Egg Facepack : अंड्याच्या या फेसपॅकमुळे चेहरा दिसेल तरूण

झेंडूच्या फुलांचा फेस पॅक कसा वापरायचा?

  1. झेंडूच्या फुलांचा फेस पॅक लावण्यापूर्वी चेहरा धुवा.

  2. त्यानंतर तुम्ही हा पॅक तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर चांगला लावा.

  3. यानंतर तुम्ही पॅक चेहऱ्यावर चांगले सुकण्यासाठी सोडा.

  4. त्यानंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवून स्वच्छ करा.

  5. चांगल्या परिणामांसाठी, आठवड्यातून तीनदा प्रयत्न करा.

  6. या पॅकचा वापर केल्याने तुमची त्वचा उजळ होऊ लागते.

उन्हाळ्यात या गोष्टी टाळा

उन्हापासून त्वचेचे संरक्षण करणे अतिशय महत्वाचे आहे. त्यासाठी, उन्हात बाहेर पडणार असाल तर  छत्री अथवा डोक्याचा रुमाल किंवा टोपीचा वापर करा.

डोळ्यांभोवतीची त्वचा चेहर्‍याच्या इतर त्वचेच्या तुलनेत नाजुक असते, म्हणूनच उन्हात जाताना सन ग्लासेस घाला. तसेच सनस्क्रीनचा वापर करा.

उन्हाळ्यामध्ये खूप मेकअप वापरू नका, कारण त्वचेला श्वास घेऊ देणे महत्वाचे आहे. उन्हाळ्यामध्ये पावडर स्वरुपातील मेकअप उत्पादने वापरणे केंव्हाही चांगले.

ह्या ऋतूमध्ये ओठ कोरडे पडतात. त्यांची काळजी घेण्यासाठी  लिप बामचा वापर करा.

घाम आणि चिकटपणामुळे त्वचेची रंध्रे मोकळी राहत नाहीत. त्यांना मोकळे ठेवण्यासाठी काकडी किंवा आलोवेरा असलेला टोनर वापरा.

त्वचेवर अँटी ऑक्सिडेन्ट सीरमचा वापर करा आणि रोजच्या खाण्यामध्ये अँटी ऑक्सिडण्ट युक्त पदार्थांचा समावेष करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.