Skin Tightening Exercise : चेहऱ्याची त्वचा सैल पडलीय? हे व्यायाम करतील मदत

त्वचा नेहमीच आकर्षक आणि सुंदर दिसावी असं प्रत्येकाला वाटत
Skin Tightening Exercise
Skin Tightening Exercise esakal
Updated on

Skin Tightening Exercise : वय वाढत असताना आपल्या शरीरात अनेक बदल होत असतात. त्याचे प्रमुख लक्षण हे आपली टाईट असलेली त्वचा सैल होणे होय. पण, काही लोकांच्याच बाबतीत जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयी देखील त्वचा सैल होण्याचे कारण बनू शकतात.

या समस्येसाठी स्किनकेअर रुटीन फॉलो करणं गरजेचं आहे. चला जाणून घेऊया असे अनेक मार्ग आहेत. ज्याद्वारे आपण आपली त्वचा अधिक टाईट बनवू शकता. त्यापैकी एक म्हणजे व्यायाम, चेहऱ्याचा व्यायाम देखील आपली त्वचा घट्ट बनवू शकतो.

Skin Tightening Exercise
Skin Care : स्क्रबिंग किती वेळ करावं हेसुद्धा माहिती असणं गरजेचं? नाहीतर चेहरा...

उतरत्या वयात त्वचा टाईट ठेवायची असेल तर तुमच्या जेवणाच्या ताटात या 5 गोष्टींचा समावेश नक्की करा. कारण यामुळे तुमच्या त्वचेवर आलेल्या सुरकूत्या कमी होतील.

Skin Tightening Exercise
Summer Skin Care: रखरखत्या Summer मध्ये त्वचा करपलीय, मग या मातीचा थंड लेप करेल त्वचेचं संरक्षण...

ब्रो रायझर व्यायाम

या व्यायामाच्या नावावरून समजल्याप्रमाणे भुवया लावून व्यायाम करावा लागतो. भुवया आणि कपाळाजवळची त्वचा घट्ट करण्यासाठी हा व्यायाम करणे फायदेशीर ठरू शकते. रात्री झोपण्यापूर्वी हे जेल चेहऱ्यावर लावा, काही दिवसात तुम्हाला त्याचा परिणाम दिसणार नाही.

ब्रो रेझर व्यायाम कसा करावा

ब्रो रेझर व्यायाम करण्यासाठी, प्रथम आपले तर्जनी बोट आपल्या भुवयांच्या शेवटी ठेवा आणि नंतर त्वचेला तेथून वरच्या दिशेने उचला. ही स्टेप दररोज 7 वेळा सुमारे 10 सेटमध्ये करा, काही वेळातच तुम्हाला त्याचा परिणाम दिसू लागेल.

Skin Tightening Exercise
Skin Care Routine : टॉयलेट सीट पेक्षाही घाण असतात मेकअप ब्रश! संशोधनात धक्कादायक दावा...

गालांचा मसाज

त्वचा नेहमीच आकर्षक आणि सुंदर दिसावी असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यासाठी मुली वेगवेगळे उपाय देखील करतात. फेशिअल योग प्रकार देखील चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास उपयुक्त ठरू शकतो. गालांचा मसाज कसा करावा हे सविस्तर रुपात पाहुया.

  • सर्वप्रथम तोंडामध्ये हवा भरत गाल फुगवा.

  • आता हाताच्या सहाय्याने फुगलेल्या गालांवर हलक्या हाताने मसाज करा.

  • दोन्ही गालांना समान मसाज करा.

  • त्यानंतर चेहरा मुळ स्थितीमध्ये आणा.

  • यामुळे त्वचेच्या स्नायुंना आराम मिळतो.

  • एकाच वेळी तुम्ही ५ वेळा हा प्रकार करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.