Skin Tips : दिवाळीच्या प्रदूषणाने चेहरा काळवंडलाय? या स्कीनकेअर टीप्सने पून्हा मिळवा तजेलदार त्वचा

दिवाळीनंतरच्या प्रदूषणामुळे तुमची त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसू देऊ नका
Skin Tips : दिवाळीच्या प्रदूषणाने चेहरा काळवंडलाय? या स्कीनकेअर टीप्सने पून्हा मिळवा तजेलदार त्वचा
Updated on

दिवाळी ही अशी वेळ असते जेव्हा आपण अति तेलकट फॅट्सने युक्त पदार्थ अगदी सऱ्हास खातो. यामुळे आपलं रूटीन तर बदलतच पण याचा चेहऱ्यावरही फरक पडतो.सामान्यपणे बायका प्री-दिवाळी स्किनकेअर रूटीन फॉलो करतात आणि उत्सवादरम्यान भरपूर मेक-अप करतात. याने आपली त्वचा वारंवार कोरडी आणि रुक्ष होते आणि परिणामी चेहऱ्याची चमक जाते.दिवाळीनंतरच्या प्रदूषणामुळे तुमची त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसू देऊ नका. दिवाळीनंतर तुमची त्वचा पुनरुज्जीवित करण्यासाठी या 7 टिप्स ट्राय करा

Skin Tips : दिवाळीच्या प्रदूषणाने चेहरा काळवंडलाय? या स्कीनकेअर टीप्सने पून्हा मिळवा तजेलदार त्वचा
Skin Care Tips : या ५ गोष्टी करा त्वचा राहिल फुलांप्रमाणे नाजूक

1. मेकअप टाळा

मेकअप करणं पुढचे काही दिवस टाळा. दिवाळीत वारंवार मेकअप केल्याने आपली स्किन रुक्ष होते; याच मुख्य कारण म्हणजे डेली रूटीन बिघडलेल असतं आपण हेल्दी खाण्याहूनही जास्त तेलकट खातो त्यामुळे चेहराही खराब होतो त्यात केमिकल प्रॉडक्ट्स चेहऱ्याला लावल्याने स्किन अजून जास्त खराब होते. पुढचा आठवडाभर तरी त्वचेचं मॉइश्चरायझेशन वाढवा आणि तिला हायड्रेट ठेवण्यासाठी प्रयत्न करा.

Skin Tips : दिवाळीच्या प्रदूषणाने चेहरा काळवंडलाय? या स्कीनकेअर टीप्सने पून्हा मिळवा तजेलदार त्वचा
Skin Care Tips: जाणून घ्या, ब्राह्मीचे त्वचा आणि केसांवर होणारे फायदे

2. क्लीनिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग

लोकांची नजर ज्यावर सगळ्यात जास्त असते तो तुमचा चेहरा, म्हणून दररोज क्लीनिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग (CTM) ही पथ्ये पाळा. हे तीन टप्पे निरोगी त्वचेचे रहस्य आहेत. CTM नंतर, सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपल्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी SPF असलेले सनक्रिम देखील चेहऱ्यावर लावा.

Skin Tips : दिवाळीच्या प्रदूषणाने चेहरा काळवंडलाय? या स्कीनकेअर टीप्सने पून्हा मिळवा तजेलदार त्वचा
Dry Skin Tips: उन्हाळ्यात त्वचेला कोरडेपणापासून वाचवण्यासाठी खास टिप्स

3. झोप

तजेलदार त्वचेसाठी दररोज रात्री 7-8 तास झोप घ्या. तुम्ही झोपत असताना तुमची त्वचा कोलेजन पुन्हा निर्माण करते आणि चेहऱ्यावरच्या डागांची दुरुस्ती करते.

4. ग्रीन चहा

ग्रीन टी पिणे तुमच्या शरीरासाठी आरोग्यदायी आहेच पण चेहाऱ्यसाठीही खूप लाभदायक आहे. त्यातले अँटिऑक्सिडंट्स तुमची त्वचा चमकण्यास मदत करतात आणि शरीरातील बॅक्टेरिया वाढू देत नाही. फेस मास्क तयार करण्यासाठी दही, दूध आणि मध सोबत ग्रीन टी पावडर एकत्र करा. चेहऱ्यावर १५ मिनिट लावा आणि पाण्याने धुवून टाका. योग्य परिणामांसाठी आठवड्यातून दोनदा असे करा.

Skin Tips : दिवाळीच्या प्रदूषणाने चेहरा काळवंडलाय? या स्कीनकेअर टीप्सने पून्हा मिळवा तजेलदार त्वचा
Skin Care Tips: फक्त 5 मिनिटांत दिसाल फ्रेश; ट्राय करा या टिप्स

5. शीट मास्क

तुमच्या त्वचेचे आरोग्य आणि सौंदर्य वाढवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे शीट मास्क. या मास्कमुळे त्वचेला दीर्घकाळ टिकणार्‍या ग्लोसाठी आवश्यक असे अतिरिक्त हायड्रेशन मिळते. जेव्हा तुमची त्वचा निस्तेज दिसत असेल तेव्हा शीट मास्कच्या मदतीने तुम्ही चेहऱ्याला अधिक तेजस्वी बनवू शकतात. त्वचेचा कोरडेपणा किती आहे यावर ठरवा की हा मास्क आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरायचा.

Skin Tips : दिवाळीच्या प्रदूषणाने चेहरा काळवंडलाय? या स्कीनकेअर टीप्सने पून्हा मिळवा तजेलदार त्वचा
Skin Care Tips: संत्र्यापासून बनवलेल्या घरगुती फेस पॅकमूळे उजळू शकते तमची त्वचा!

6. वर्कआउट्स

व्यायाम हा शरीरासाठी कधीही चांगला असतो. कारण व्यायामामुळे शरीरातून जो घाम निघतो तो शरीरातली अशुद्धता बाहेर काढत. याव्यतिरिक्त, व्यायामामुळे नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्सचे उत्पादन वाढते, जे पेशींचे संरक्षण करण्यास आणि निरोगी त्वचा राखण्यास मदत करते. आठवड्यातून किमान तीन-चार वेळा ४५-६० मिनिटे व्यायाम करा. त्वचेच्या समस्या टाळण्यासाठी हे एक प्रभावी तंत्र आहे.

Skin Tips : दिवाळीच्या प्रदूषणाने चेहरा काळवंडलाय? या स्कीनकेअर टीप्सने पून्हा मिळवा तजेलदार त्वचा
Morning Skin Care: सकाळी उठल्यावर 'या' पाच गोष्टी करा; चाळीशीतही दिसाल अभिनेत्रींसारखं तरूण

7. व्हिटॅमिन सीच्या फळांची साले

स्किनकेअरमधील सर्वात प्रभावी घटकांपैकी एक म्हणजे व्हिटॅमिन सी, त्वचेला तेजस्वी आणि तरुण दिसण्यासाठी खूप फायद्याचे असते. बहुतेक अँटी-एजिंग क्रीम्समध्ये व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी पील ही त्वचा दुरुस्त करण्याचा एक सोपा मार्ग आहे आणि त्वचेच्या पेशींच्या वाढीस मदत करते. याव्यतिरिक्त, ते डार्क स्पॉट आणि मुरुमांच्या डागांना मदत करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.