Smartphone Hazards : पालकांनो, सावध व्हा.., स्मार्टफोनच्या वापराने लहानमुलांत वाढतायेत मानसिक आजार

लहान मुलांमध्ये स्मार्टफोनचा वापर फार वाढल्याने काही दुष्परीणाम समोर येऊ लागले आहेत.
Smartphone Hazards
Smartphone Hazardsesakal
Updated on

Smartphone Addiction In children Harms Their Mental Health : हल्लीच्या टेक्नोलॉजीच्या दुनियेत आपल्या मुलांनीही इतरांच्या बरोबरीने टेक्नोसॅव्ही असावे असं पालकांना वाटत असतं. पालकांना त्यांच्या कामातून वेळ नसल्याने तेही सहज मुलांच्या हातात फोन, टॅब देतात. यामुळे मुलांना त्याची सवय लागते. पण मुलांमध्ये स्मार्टफोनचा वाढता वापर हे त्यांच्या भविष्यासाठी धोक्याची घंटा आहे.

एका ग्लोबल सर्वेक्षणात असे तथ्य समोर आले आहेत की, जे जाणून प्रत्येक पालकाने सतर्क व्हायला हवे. सर्वेक्षणानुसार जेवढ्या लहान वयात मुलांच्या हातात स्मार्टफोन दिला जातो तेवढाच लवकर ते मुल तारुण्यातील आणि वृद्धावस्थेतील मानसिक समस्यांना बळी पडू शकतो.

काय आहे या सर्वेक्षणात?

  • जागतिक स्तरावर आणि टाइम्स ऑफ इंडियाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या या सर्वेक्षणाचा अहवाल भीतीदायक आहे.

  • यात सांगण्यात आलं आहे की, कमी वयात दिलेला स्मार्टफोन, टॅब यामुळे मानसिक आरोग्याच्या मापदंडात वेगाने घट होत आहे.

  • कमी वयातच ज्या मुलांच्या हातात फोन आले त्यांच्यात तरुणपणी आत्महत्येशी निगडीत विचार, इतरांविषयी आक्रमकता, वास्तविकता आणि भ्रम यात गोंधळ होत असल्याची माहिती समोर आली आहे.

Smartphone Hazards
Mental Health Problems : मानसिक आरोग्याच्या विळख्यात मेंटली फिट कसं रहायचं? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

कुठे कुठे करण्यात आला सर्वेक्षण

अमेरिकेतल्या एनजीओ सॅपियन लॅब्जने हा स्टडी केला आहे. ४० पेक्षा जास्त देशांमध्ये हा अभ्यास करण्यात आला. यात १८ ते २४ वयोगटातील २७,९६९ यांचे निरीक्षण करण्यात आले आहे. यात भारतातले साधारण ४ हजार तरुणांचा समावेश होता.

या अभ्यासातून समजले आहे की, महिलांवर याचा अधिक परिणाम दिसतो. एज ऑफ फर्स्ट स्मार्टफोम अँड मेंटल वेलबीइंग आउटकम स्टडी अंतर्गत मेंटल हेल्थ कोशेंट (MHQ) मध्ये मानसिक लक्षणं आणि क्षमतांचा अभ्यास करण्यात आला.

Smartphone Hazards
‘या’ मुळं बिघडतेय Mental Health त्वरित बदला त्या सवयी..

कोणत्या वयात हाता आला स्मार्टफोन?

  • सर्वेक्षणात ७४ टक्के तरुणी अशा होत्या ज्यांना वयाच्या ६ व्या वर्षीच स्मार्टफोन हातात मिळाला. या तरुणींमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या अधिक दिसून आल्या.

  • तेच वयाच्या १० व्या वर्षापासून स्मार्टफोन हाताळणाऱ्यांमध्ये या समस्या कमी होत ६१ टक्क्यांवर आढळल्या.

  • तर १५ व्या वर्षी पहिला स्मार्टफोन हाताळणाऱ्या तरुणांमध्ये मानसिक आरोग्याशी निगडीत समस्या ५२ टक्के होत्या.

  • वयाच्या १८ व्या वर्षापासून स्मार्टफोन हाताळणाऱ्यांमध्ये या समस्या ४६ टक्के होत्या.

  • पुरुषांमध्येही हाच ट्रेंड आढळला. पण त्यांना त्रास तुलनेने कमी होता.

Smartphone Hazards
Students Mental Health : यश की अपयश? परीक्षेची भीती वाटते? असे करा स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार...

सर्वेक्षणात पालकांसाठी संदेश

सर्वेक्षणाच्या अहवालात आई-वडिलांसाठी स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. यात म्हटले आहे,

मुलांना फोन देण्यास शक्य तेवढा उशीर करा.

न्युरोसायंटिस्टच्या मते मुलांवर आपल्या मित्रांचे प्रेशर फार असते. अशात त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या.

मुलांचा सामाजिक विकास, त्यांची मानसिक प्रगती आणि जगाला नॅव्हिगेट करण्याची क्षमता यासाठी ते फार आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना फोनपासून लांब ठेवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()