Smoking Habit : चहा-कॉफीसोबत सिगारेट ओढत असाल तर होतील गंभीर परिणाम

जर तुम्हाला चहा किंवा कॉफीसोबत सिगारेट ओढायची सवय असेल तर याचा अर्थ तुम्ही एकाच वेळी दोन व्यसने करत आहात.
Smoking
Smokinggoogle
Updated on

मुंबई : चहा पिणारे अनेकदा चहासोबत अशा चुका करतात, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागतो. बरेच लोक सिगारेट ओढत किंवा दारू पिऊनही चहाची घोट घेणे थांबवत नाहीत.

केवळ धूम्रपान करणे किंवा मद्यपान करणे आरोग्यास हानी पोहोचवण्यासाठी पुरेसे आहे. पण काही लोक सिगारेट आणि दारू पिऊन चहाचा आस्वाद घेत आपले आरोग्य अधिकच अडचणीत आणतात. तुम्हीही सिगारेट किंवा दारू पिऊन चहा पित असाल तर आता जागृत होण्याची वेळ आली आहे. (smoking with tea and coffee will be dangerous )

Smoking
DRDO Job : डीआरडीओमध्ये परीक्षेविना नोकरी; आयटीआय, डिप्लोमा, पदवीधरांना संधी

द इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर रिसर्चचे शास्त्रज्ञ डॉ शूमेकर यांनी एका अभ्यासात उघड केले आहे की एका आठवड्यात सुमारे ७५० मिली अल्कोहोलचे सेवन केल्याने कर्करोगासारख्या घातक रोगाचा धोका आठवड्यातून तितका वाढतो आणि जेव्हा तुम्ही सिगारेट आणि अल्कोहोल दोन्ही एकत्र पितात तेव्हा रोगाचा धोका आणखी वाढतो.

आपण चहा-कॉफीसोबत सिगारेट का ओढू नये ?

जर तुम्हाला चहा किंवा कॉफीसोबत सिगारेट ओढायची सवय असेल तर याचा अर्थ तुम्ही एकाच वेळी दोन व्यसने करत आहात. एक व्यसन कॅफिनचे आणि दुसरे सिगारेटचे. चहा आणि कॉफी या दोन्हीमध्ये कॅफिन असते. जेव्हा तुम्ही कॅफिनसोबत सिगारेट ओढता तेव्हा तुमच्या फुप्फुसांवर वाईट परिणाम होऊ लागतो.

Smoking
ITR Filing : आयटीआर भरताना या चुका मुळीच करू नका

शरीराच्या अनेक भागांवर परिणाम होऊ शकतो

सिगारेटमधून निघणाऱ्या धुरात कार्बन मोनोऑक्साइड वायू असतो, ज्यामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होते, याची तुम्हाला जाणीव असेल. शिवाय, कॉफी आणि चहासोबत सिगारेटचे सेवन केले जाते, तेव्हा परिस्थिती आणखी गंभीर होते. याचा परिणाम तुमच्या फुप्फुसांवर तर होईलच पण शरीराच्या इतर भागांवरही वाईट परिणाम होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()