Snakes In Flood : महापुरात पाणीच नाही तर घरात सापही येऊ शकतात? हे उपाय करा साप घराकडे फिरकणारही नाहीत

Snakes from your home in flood : पुराचे पाणी जसे आपल्या घरात शिरते. तसे ते सापांच्या निवाऱ्यालाही उध्दवस्त करते. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी साप वाट दिसेल तिकडे पळत सुटतात.
Snakes In Flood
Snakes In Floodesakal
Updated on

Snakes from your home in flood : :

पावसाचा जोर वाढल्याने पुणे, कोल्हापूर, सांगली शहरात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरजन्य स्थितीत अनेक संकटांचा सामना करावा लागतो. पुर आल्यावर पसारा हालवणे, पुरातून शेजाऱ्यांना, कुटुंबातील सदस्यांना बाहेर काढण्याचे काम करावे लागते.

पण, पुरात आणखी एक धोका असतो ते म्हणजे गल्लीबोळात, दारात, घरात साप येण्याचा. पुराचे पाणी जसे आपल्या घरात शिरते. तसे ते सापांच्या निवाऱ्यालाही उध्वस्त करते. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी साप वाट दिसेल तिकडे पळत सुटतात.

Snakes In Flood
Rain Snake Bite Precaution : आला पावसाळा, सर्पांपासून सांभाळा! प्रशिक्षित सर्पमित्रांनाच बोलवा

काहीवेळा साप पुराच्या पाण्यातून घरात जाऊन बसतात. आणि पूर ओसरल्यावर लोकांना घरात सापांचाच सुळसुळाट दिसतो. त्यामुळे यंदाच्या पावसात अन् पूर परिस्थितीत काय काळजी घ्यावी याच्या काही सोप्पे उपाय पाहुयात.

घरात पुराचे पाणी आल्यास काय करावे?

घरात पुराचे पाणी आले असेल सर्वात आधी कुटुंबातील सर्व सदस्यांना सोबत घेऊन स्थालांतर करा. त्यानंतर तर दारे खिडक्या बंद करून मगच घरातून बाहेर पडा. कारण, पूर ओसरण्यासाठी किती काळ जावा लागतो याचा काहीच अंदाज बांधता येत नाही. अशावेळी टेरेवरील दरवाजे, खिडक्या सर्वकाही पॅक करा आणि मगच बाहेर पडा. यामुळे साप घरामध्य प्रवेश करू शकणार नाहीत.

Snakes In Flood
Snake Bite to Youth: सापानं चावा घेतल्यानंतर त्यानंही घेतला चावा! सापाचा झाला मृत्यू पण तरुणाचं काय झालं?

ब्लीच पावडर 

जर घराजवळ आलेल्या पुरामुळे तुम्हाला सापांची भिती वाटत असेल. तर,  ब्लीच पावडरीची फवारणी केल्याने साप घरापासून दूर राहू शकतात. यासाठी पाण्याच्या बाटलीमध्ये ब्लीच पावडर मिक्स करून ते पाणी घराजवळ, बागेत, अंगणात टाका. याच्या वासाने साप घराकडे फिरकणार नाहीत.

लवंग दालचिनीचे तेल

तुमच्या घरात असलेल्या काही वस्तू देखील तुम्हाला मदत करू शकतात. त्यासाठी लवंग, दालचिनीचे तेल तुम्ही सापांना घरापासून दूर ठेवण्यासाठी वापरू शकता. लवंग-दालचिनीचे तेल तुम्ही घराभोवती शिंपडा, त्याच्या वासाने साप आणि इतर किटकही घराजवळ फिरकणार नाहीत.

Snakes In Flood
World Snake Day Special : सर्प शत्रू नव्हे, मित्र
snake in flood

झाडे

काही विशिष्ट प्रकारची झाडे लावल्यानेही तुम्ही घराला सापांपासून सुरक्षित ठेऊ शकता. यामध्ये कॅक्टस,तुळस,स्नेक प्लॅंट, लेमन ग्रास यांचा समावेश आहे. या झाडांना घराच्या दारात, खिडकीत लावू शकता.

कांदा लसणाची पेस्ट

सापांना घरापासून दूर ठेवण्यासाठी कांदा आणि लसूण बारीक करून ही पेस्ट खिडक्या आणि दरवाजांवर लावा. त्याच्या वासाने अनेक सापही पळून जातात. तुमच्या घरच्या बागेत लसूण आणि कांद्याची रोपे लावा.

व्हिनेगर आणि दालचिनी 

सापांनी घरात येऊ नये म्हणून दालचिनी पावडर, व्हाईट व्हिनेगर किंवा लिंबाचा रस मिक्स करून घराबाहेर फवारू शकता. ज्या ठिकाणी साप आणि विंचू येण्याची शक्यता जास्त असते अशा ठिकाणी ही फवारणी नियमितपणे करावी. त्यामुळे पावसाळ्यातच नाहीतर इतरवेळीही सापांची भिती नाहीशी होते.

Snakes In Flood
Snake Bite: वेळीच उपचार मिळाल्याने वाचले ७७ लोकांचे प्राण, ग्रामीण भागात सर्पदंशाचे प्रमाण जास्त

हे लक्षात घ्या

महापुराचे पाणी ओसरल्यानंतर जेव्हा तुम्ही घरात येतो तेव्हा सावधगिरी बाळगा. साप, किडे कुठल्या कोपऱ्यात लपले असतील काहीही सांगता येत नाही. घरात साप आढळल्यास स्वत: पकडायचे धाडस करू नका, तसेच सापांना मारूही नका सर्पमित्रांना बोलवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.