2021 मध्ये आहेत बरेच Long Weekend Vacation, आतापासून करा प्लॅन

With so many long weekends coming up in the year 2021, you can definitely plan to go out 2.jpg
With so many long weekends coming up in the year 2021, you can definitely plan to go out 2.jpg
Updated on

पुणे : गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुळे काहीजण घरात बसून कंटाळले आहेत. यामुळे बाहेर कुठे तरी फिरून येण्यासाठी जो तो आतुर आहे. वर्ष 2021 सुरू होऊन पाच दिवस झाले आहे. त्यामुळे लोक सुट्टीची आतुरतेने वाट पाहत आहेत. जेणेकरून फिरण्यासाठी काहीतरी प्लॅन करू शकेल. यावर्षी अनेक वीकेंड मिळणार आहेत. एक दिवस सुट्टी घेऊन आपण चार दिवस व्हेकेशन प्लॅन आखू शकता. चला तर मग 2021 मध्ये बरेच शनिवार व रविवार आलेले आहेत आणि आपण या दिवसात फिरण्यासाठी काहीतरी प्लॅन नक्कीच करू शकतात. 

जानेवारी  

14 जानेवारीला अनेक ठिकाणी पोंगल आणि मकर संक्रांतीची सुट्टी आहे. या दिवशी गुरुवार आहे. तसेच शुक्रवारी 15 जानेवारीला सुट्टी घेऊन तुम्ही लॉन्ग वीकेंडचा प्लॅन करू शकता. त्याशिवाय 26 जानेवारीला मंगळवार आहे, त्यानंतर आपण सोमवारी सुट्टी घेऊ शकता आणि 23 ते 26 जानेवारीत कुठेतरी फिरायला जाऊ शकता. या लॉन्ग वीकेंडवर तुम्ही तुमच्या आवडत्या प्लेसवर फिरून येऊ शकता. 

फेब्रुवारी

फेब्रुवारीमध्ये अनेक ठिकाणी वसंत पंचमीची सुट्टी असते. या वर्षी हा उत्सव 16 फेब्रुवारी म्हणजे मंगळवारी येतो. आपण 15 फेब्रुवारीला चार दिवसांची सुट्टी घेऊन ट्रिपवर जाऊ शकता. या महिन्यात बेंगलोर, मैहसूर आणि ऊटीसारख्या सुंदर हिल स्टेशनवर आपला व्हॅलेंटाईन डे साजरा करू शकता.

मार्च

11 मार्चच्या दिवशी गुरुवारी महाशिवरात्री आहे. तुम्ही 12 मार्चची सुट्टी घेऊन लॉन्ग वीकेंडचा प्लॅन करू शकता. या सुट्ट्यांमध्ये तुम्ही आवडत्या ठिकाणी फिरून येऊ शकता.

एप्रिल

2 एप्रिलला गुड फ्रायडेची सुट्टी आहे. आपण या आठवड्याच्या शेवटी लॉन्ग वीकेंडचा प्लॅन आधीच करू शकता. या दिवसात टेकड्यांमध्ये आपण या सुट्टीची मजा दुप्पट घेऊ शकता.

मे

13 मे रोजी गुरुवार असून या दिवशी ईद-उल-फितरची सुट्टी आहे. 14 मे शुक्रवारी तुम्ही सुट्टी घेऊन आपण लॉन्ग वीकेंड एन्जॉय करू शकता. आपण एखाद्या नवीन ट्रिपवर जाण्याचासुद्धा प्लॅन करू शकता.

जून आणि जुलै

जून आणि जुलैच्या महिन्यात कोणताच लॉन्ग वीकेंड नाही. म्हणून, आपण भविष्यासाठी आपली सुट्टी वाचवू शकता.

ऑगस्ट

ऑगस्ट महिन्यात आपल्याला दोन लॉन्ग वीकेंड मिळू शकेल. 19 ऑगस्टला गुरुवार असून या दिवशी मोहरम आहे, अशा परिस्थितीत तुम्ही शुक्रवारची सुट्टी घेऊन चार दिवस फिरण्यासाठी जाऊन येऊ शकता. तसेच 30 ऑगस्टला सोमवारी जन्माष्टमी आहे. तुम्ही 28 ते 30 ऑगस्ट या तीन दिवसांत मान्सूनचा आनंद घेण्यासाठी काही ठिकाणी भेट देऊ शकता.

सप्टेंबर

सप्टेंबर महिन्यात काहीच लॉन्ग वीकेंड नसल्यामुळे तुम्हाला बाहेर ठिकाणी कुठे फिरायला जाता येणार नाही. 

ऑक्टोबर

तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात दोन लॉन्ग वीकेंड मिळतील. 7 ऑक्टोबरला गुरुवारी अग्रसेन जयंती आहे. आपण 8 ऑक्टोबर रोजी लॉन्ग वीकेंड घेऊ शकता आणि जम्मू काश्मीर, केरळ, कर्नाटक, राजस्थान किंवा गुजरातसारख्या ठिकाणी फिरायला जाऊन येऊ शकता. शुक्रवार, 15 ऑक्टोबर रोजी दसरा सण आहे. या तीन दिवसांच्या सुट्टीमध्ये आपण कुठेतरी फिरू शकता.

नोव्हेंबर

नोव्हेंबर महिन्यात चार तारखेला दिवाळी सण येतोय. या आठवड्यातही आपण शुक्रवारची सुट्टी घेऊन चार दिवस प्लॅन करू शकता. यावेळी आपण हिवाळ्याचा आनंद घेण्यासाठी पर्वतावर जाऊ शकता. 

डिसेंबर

या महिन्यात कोणताच लॉन्ग वीकेंड नाही. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()