Soaked Peanuts Benefits: भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने होतील आश्चर्यकारक फायदे, आजार पळतील दूर

भिजवलेल्या शेंगदाण्याची ओली साल रक्तप्रवाह सुधारते
Soaked Peanuts Benefits
Soaked Peanuts Benefitsesakal
Updated on

Soaked Peanuts Benefits: सध्या लोक सकाळची सुरूवात अनेक हेल्दी गोष्टी खाऊन करतात. काही लोक सकाळची सुरुवात हेल्दी ड्रिंकने करतात, तर काही लोकांना भिजवलेले शेंगदाणे खायला आवडतात. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. पण तुम्हाला माहित आहे का की सकाळी भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात.

खरं तर शेंगदाणे पोषक तत्वांनी समृद्ध असतात. अशावेळी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाल्ले तर शरीराला आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात. भिजवलेले शेंगदाणे खाण्याचे फायदे येथे जाणून घेऊयात. (Soaked Peanuts Benefits)

Soaked Peanuts Benefits
Jaggery Benefits : गुळासोबत तीळ की शेंगदाणे; काय खाणे जास्त चांगले?

पचनशक्ती वाढेल

फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने पचनक्रिया होण्यास मदत होते. त्याचबरोबर शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पचनक्रियेत मदत करते.

हृदयासाठी फायदेशीर

भिजवलेल्या शेंगदाण्याची ओली साल रक्तप्रवाह सुधारते आणि हृदयाचे रक्षण करते. ज्यामुळे दीर्घकाळ हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. त्याचबरोबर शेंगदाणे चयापचय वाढवतात आणि शरीराचे तापमान वाढवतात. जे रक्तप्रवाहासाठी फायदेशीर आहे.

Soaked Peanuts Benefits
Inspiring Story: कधी वेटर तर कधी मंदिराबाहेर शेंगदाणे विकले...मेहनत केली अन् आता आहे सेलिब्रिटी

पाठदुखीत कमी करते

दिवसभर एकाच ठिकाणी बसल्याने पाठीवर परिणाम होतो. भिजवलेले शेंगदाणे गुळाबरोबर खाल्ल्याने पाठीच्या या समस्येपासून आराम मिळतो. लोह, मॅंगनीज, पोटॅशियम, तांबे, कॅल्शियम आणि सेलेनियमयुक्त भिजवलेले शेंगदाणे सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने गॅस आणि अॅसिडिटी कमी होते.

स्मरणशक्ती आणि दृष्टी सुधारते

शेंगदाण्यामध्ये असलेले जीवनसत्त्वे दृष्टी आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करतात. सकाळी भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने मुले आणि प्रौढांची स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते.

Soaked Peanuts Benefits
शेंगदाणे आहे प्रथिनांचा चांगला स्त्रोत,नक्की सेवन करा

खोकल्यापासून आराम मिळतो

अनेकवेळा खोकल्यावर कितीही उपाय केले तरी तो दूर होत नाही. वेगवेगळी औषधं घेऊनही खोकला कमी होत नाही. असं म्हणतात की, शेंगदाणे खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. आणि हे जर काही दिवस तुम्ही सतत खाल्ले तर खोकला कायमचा बरा होऊ शकतो.

शेंगदाणे कधी खावेत?

तज्ज्ञांच्या मते, भिजवलेले शेंगदाणे खाण्याची उत्तम वेळ म्हणजे सकाळी नाश्ता करण्यापूर्वी. जेवणाच्या दरम्यान भूक लागल्यास स्नॅक म्हणूनही शेंगदाणे खाऊ शकता. शेंगदाण्यांमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे ते रात्री उशीरा खाऊ नयेत.

शेंगदाणे किती प्रमाणात खावेत?

शेंगदाण्यांमध्ये कॅलरीज जास्त असतात. त्यामुळे ते जास्त प्रमाणात खाऊ नयेत. कारण यामुळे तुमचे वजन वाढू शकते. तरीही खबरदारी घेऊन याचे सेवन केले तर त्याचे अनेक फायदे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.