Soap Benefits : तूम्हीही रोज साबण लावून अंघोळ करता का?; आधी हे वाचाच!

एका पिढीकडून लहानांकडे हा साबणाचा वारसा चालत आला आहे.
Soap Benefits
Soap BenefitsEsakal
Updated on

हा काय प्रश्न आहे का?. जगातले सगळेच लोक साबण लावूनच अंघोळ करतात ना? त्यात काय एवढं विचारण्यासारखं. तूम्ही अगदी लहान असल्यापासून साबण वापरताय. आणि आता तूमची मुलेही साबणच वापरतात. एका पिढीकडून लहानांकडे हा साबणाचा वारसा चालत आला आहे. पण, असे करणे फायद्याचेच आहे.

होय, रोज साबणाने अंघोळ करणे फायद्याचे असल्याचे त्वचारोग तज्ञांचे म्हणणे आहे. आज आपण त्वचारोग तज्ज्ञांकडून याबाबतचे तथ्य जाणून घेणार आहोत.

Soap Benefits
Daily Bath Habit : रोज अंघोळ करणे गरजेचे आहे काय? तज्ज्ञांचं मत वाचून तुम्हीही अवाक व्हाल

कानपूरच्या जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजचे असिस्टंट प्रोफेसर आणि त्वचारोगतज्ज्ञ डॉ युगल राजपूत यांच्या मते, रोज साबणाने आंघोळ करण्याचे अनेक फायदे आहेत. साबण आपल्या त्वचेतील मृत टिश्यू बॅक्टेरिया आणि बुरशी साफ करण्यास मदत करते. यामुळे आपल्या त्वचेवर कोणताही संसर्ग होत नाही आणि शरीराला दुर्गंधीही येत नाही.

Soap Benefits
Indian Superbrand : 100 वर्षांचा इतिहास असलेला साबण आजही लोकांच्या हृदयावर करतोय राज्य

साबण आपल्या त्वचेवर साचलेली धूळ आणि घाण काढून टाकतो. याशिवाय चेहऱ्यावरची डेड स्किनही काढली जाते. साबण प्रत्येक ऋतूमध्ये फायदेशीर आहे.

Soap Benefits
'बंटी तेरा साबण स्लो है' या जाहीरातीतील मुलगी आठवतेय?

हिवाळ्यात कोणता साबण वापरावा

डॉ.युगल राजपूत सांगतात की, हिवाळ्यात आंघोळीसाठी मॉइश्चरायझिंग साबण वापरणे अधिक फायदेशीर ठरू शकते. यामुळे तुमची त्वचा कोरडी होत नाही आणि त्वचेत ओलावा टिकून राहतो. बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करतो.

Soap Benefits
Winter Health Care : थंडीनं तापमानाचा पारा घसरला; हार्ट अटॅकचाही धोका वाढला, अशी घ्या काळजी

जर तुम्हाला महागडा मॉइश्चरायझिंग साबण घ्यायचा नसेल तर तुम्ही कमी किमतीत मिळणारा साबण देखील वापरू शकता. रेग्युलर साबण वापरल्याने त्वचा कोरडी होऊ शकते, अशा स्थितीत आंघोळीनंतर मॉइश्चरायझर लावावे. मॉइश्चरायझर लावल्याने तुमच्या कोरडी होणार नाही.

Soap Benefits
Winter Skin Care : थंडीमध्ये मॉइश्‍चराइजर वापरूनही चेहरा दिसतोय खराब? ट्राय करा या टिप्स

साबण लावण्याचे काही तोटे

त्वचारोग तज्ज्ञांच्या मते, साबण लावण्याचे काही तोटेही आहेत. साबण जास्त वापरल्यास त्वचा कोरडी होऊ शकते. साबणामध्ये मूलभूत घटक असतात. ज्यामुळे आपल्या त्वचेची आर्द्रता कमी होऊ शकते. कोरड्या त्वचेमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. त्वचेला सतत खाज सुटू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.