Friendship Day 2023 : सोशल मीडियाच्या बाँडमुळे, फ्रेंडशिप बँडचा विसर

फ्रेंडशिप डे ला सर्वजण आपल्या मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा देत असतात. मात्र, कोविडपासून सगळ्या सणांसारखा हा फ्रेंडशिप डे देखील उदास वाटू लागलाय.
sakal
sakalsakal
Updated on

-अक्षय बडवे

ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा इंटरनॅशनल फ्रेंडशिप डे (International Friendship Day) म्हणून साजरा केला जातो. असे म्हटले जाते की आयुष्य या नावाच्या स्क्रीनची जेव्हा बॅटरी लो होते तेव्हा पॉवर बँक म्हणून जे मदतीला येतात, जे साथ देतात ते म्हणजे 'मित्र'.

फ्रेंडशिप डे ला सर्वजण आपल्या मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा देत असतात. मात्र, कोविडपासून सगळ्याच सणांना एक वेगळे स्वरुप प्राप्त झाले आहे.

sakal
Friendship Day 2021: हे गिफ्ट द्या अन् मैत्री करा आणखी घट्ट!

फ्रेंडशिप डे चा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा डोळ्यासमोर येतं ते म्हणजे विविध रंगाचे फ्रेंडशिप बँड. या मैत्री दिना दिवशी बँड किंवा ब्रेसलेट एकमेकांना बांधायची सुरुवात मध्य आणि दक्षिण अमेरिकेत झाली असे कळते. तिथले लोक हे ब्रेसलेट आपल्या मित्र-मैत्रिणींच्या हातात बांधत. हा बँड मैत्रीचे प्रतीक म्हणून एकमेकांना ते देत असत. तोच वारसा पुढे सगळ्या जगात पसरला.

आठवलं ना? शाळेत असताना विविध आकाराचे, रंगाचे हे फ्रेंडशिप बँड तुम्ही मित्र- मैत्रिणींच्या हातावर बांधत. कोणी स्पेशल मित्र किंवा मैत्रीण जर हा बँड बांधणार असेल तर तुम्ही मात्र हाताचा पुढचा भाग या स्पेशल बँडसाठी राखीव ठेवतच असणार. या दिवसाची शाळेत काय कॉलेजमध्ये देखील अनेक जण आतुरतेने वाट बघत. एकमेकांना भेटून फ्रेंडशिप बँड बांधून, खाऊन पिऊन हा दिवस अत्यंत जल्लोषात साजरी करत. मात्र काही दिवसापासून असं दिसून येत आहे की सोशल मीडियाच्या बॉण्डमुळे या फ्रेंडशिप बँड चा विसर होतोय.

sakal
friendship day: ..तर समजा तुम्ही बेस्ट फ्रेंडच्या प्रेमात पडलात

कोविडच्या प्रादुर्भावा आधी देखील अनेक व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार फ्रेंडशिप बँड ची क्रेझ तरुणाई मध्ये कमी झाली आहे. अजूनही अनेक दुकानांमध्ये हे बँड विक्रीसाठी आहेत. यांची किंमत दहा रुपयापासून पाच हजारापर्यंत आहे. गेले तीन ते चार वर्षापासून या बँड च्या विक्रीत मोठी घसरण पाहायला मिळतेय. एका व्यापाऱ्याला विचारणा केली असताना ते सांगतात की, "हल्लीच्या पिढीला सगळे सण ऑनलाइन साजरे करायचे आहेत. गेल्या चार-पाच वर्षापासून या दिवसाची लगबग बघायला मिळत नाही यामुळेच आम्ही या बँड ची विक्री कमी केली आहे."

आजकाल फेसबूक, इंस्टाग्राम अशा अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून फ्रेंडशिप डे साजरा केला जातो आहे. काही तरुणांना जेव्हा या फ्रेंडशिप बँड चा विसर होतोय का असं विचारलं तेव्हा ते म्हणाले की, "हो फ्रेंडशिप बँड आज-काल आम्ही एकमेकांना देत नाहीत. एकतर कोरोनाच्या नियमावलीमुळे एकमेकांना भेटणं होत नाही मग आम्ही बँड कसा देणार? सोशल मीडिया एका क्लिक वर असताना या बँड चे महत्व देखील कमी झाले आहे हेही नक्कीच."

मैत्रीसह दोस्ती, यारी, जान या निःस्वार्थी नात्याची अशी अनेक नाव आहेत. 'तू कर रे मी आहे ना', अश्या सुख-दुःखाच्या काळात नेहमी पाठीशी उभे असलेले देव रूपात आलेली माणसं म्हणजेच मित्र. ऑनलाइनच्या युगात मित्र-मैत्रिणींना भेटणे, त्यांच्याशी गप्पा मारणे हे नक्कीच कमी झाल्याचं दिसत आहे. जसं फ्रेंडशिप बँड ला विसरलात तसंच आपल्या एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीची विसर होऊ देऊ नका!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.