सुनील इंगळे
सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यामुळे विविध पक्षांचे कार्यकर्ते, समर्थक सोशल मीडियावर विविध राजकीय पोस्ट फॉरवर्ड करताना दिसत आहेत. दरम्यान, अशा पोस्टवरून वाद होतात. मग अॅडमिनला जबाबदार धरले जाते. त्यामुळे समाज माध्यमातील सामाजिक, फॅमिली ग्रुप व इतर ग्रुप ‘नो इलेक्शन झोन’ झाले आहेत. पोस्टवरून वाद नको म्हणून बहुतांश ग्रुपच्या सेटिंग्जमध्ये अॅडमिन्सने ‘ओन्ली अॅडमिन’ असे बदल केले आहेत.
समाज माध्यम हे मुक्त व्यासपीठ म्हणून ओळखले जात आहे. यामुळे प्रत्येक व्यक्ती हा समाज माध्यमावर व्यक्त होतो. यात अनेक जणांनी समाज माध्यमावर सामाजिक, फॅमिली ग्रुप केलेले आहेत. यावर ते मुक्तपणे व्यक्त होतात. त्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांचे, संघटनांचे कार्यकर्तेही सहभागी असतात.
मात्र, सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू असल्याकारणाने काही नेत्यांच्या समर्थनार्थ निवडणुकीच्या पोस्ट शेअर करण्यात येतात. अशा प्रकारे त्या ग्रुपचा मुख्य हेतू दूर राहतो आणि एक राजकीय अड्डा तयार होतो. मग प्रतिस्पर्धी एखाद्या मैदानात उतरल्यासारखे एकमेकांवर तुटून पडतात. व्हिडिओ, फोटो आणि मेसेजमुळे ग्रुपवर जणू युद्धच सुरू होते. या ‘सोशल वॉर’मुळे बरीच नाती, मैत्रीचे संबंध खराब होते. याचा त्रास त्या ग्रुप अॅडमिनला होतो. त्याला जबाबदार धरून त्रास द्यायला सुरवात होते. हे टाळण्यासाठी समाज माध्यमांवरील ग्रुप ‘ओन्ली अॅडमिन’ झाले आहेत.
अन्यथा होईल कारवाई
निवडणुकीच्या काळात समाज माध्यमावर एखादी पोस्ट तयार व व्हायरल करणे यावरून गुन्हा नोंद होऊ शकतो. यामुळे नागरिकांनी समाज माध्यमावरची सेटिंग बदलावी; तसेच ग्रुपवर कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट केली जाणार नाही, याच्या सूचना कराव्यात; अन्यथा एखादी आक्षेपार्ह पोस्ट तयार किंवा व्हायरल झाल्यास ग्रुप अॅडमिनला कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचे पालन करणे अनिवार्य आहे; तसेच समाज माध्यमावर फिरणाऱ्या पोस्ट यावर पोलिस; तसेच जिल्हा कार्यालयामार्फत तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी समाज माध्यमावर पोस्ट करण्यापूर्वी आक्षपार्ह पोस्ट असेल, तर फॉरवर्ड करू नये. ग्रुपवर तशा सूचना कराव्यात.
- सुनील कराळे, एपीआय, सायबर पोलिस.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.