उन्हाळ्यात थंड सरबत आणि ज्यूसची घरी रेलचेल असते. घरी आलेल्या पाहुण्यांना थंडगार करण्यासाठी सोलकढीही करू शकता. सोलकढी जेवणानंतर पिणे फायद्याचे असते. कारण, आमसुलातील पोषक तत्व जेवण पचवण्यास मदत करतात. पण उन्हाळ्यातही तिचे सेवन करणे फायद्याचे ठरते.
तुम्ही ही सोलकढी बनवून फ्रिजमध्ये ठेऊ शकता. ज्यामुळे कधी पाहुणे मंडळी आली. तर ही सोलकढी पिऊन ते तृत्प होतील. सोलकढी अगदी कमी वेळेत तयार होते.
मूठभर अमसुले भिजवून, २ हिरव्या मिरच्या व ३ ते ४ लसूण पाकळ्या वाटून, १ नारळ वाटून दूध काढून अंदाजे ५ वाट्या, मूठभर कोथिंबीर बारीक चिरून, चवीनुसार मीठ.
मूठभर अमसुले कोमट पाण्यात भिजवून २ ते ३ तासाने त्याचा उतरलेला अर्क अमसुले हाताने पाण्यात थोडी कालवून गाळून घ्यावा.
१ नारळ वाटून अंदाजे ५ वाट्या दूध काढून गाळून घ्यावे.
नारळाचे दूध व अमसुलाचे पाणी मिसळावे व त्यात लसूण, मिरची वाटून घालावी.
चवीनुसार मीठ घालावे व कोथिंबीर घालून ढवळावे.
सोलकढी गारच सर्व्ह करायची. उकळायची अजिबात नाही. माशांच्या जेवणाबरोबर प्लेन भाताबरोबर सर्व्ह करावी.
सोलकढी पातळ असते. जास्त आंबट करू नये. त्याकरता आमसुले कमी घ्यावीत. तसेच हवे असेल तरच साखर घाला.
अमसुले कुस्करून रस काढू नये. रंग काळपट होतो.
नारळाचे दूध मिक्सरमध्ये काढत असताना त्यामध्यो कोमट पाणी वापरावे.
नारळाच्या दुधात एक वाटी साधे दूध वापरावे याने नारळाच्या दुधाला पांढराशुभ्र रंग येतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.