Solo Travelling Tips : आजकाल अनेक जण फिरायला जातात. तरूणाईमध्ये तर सोलो ट्रॅव्हलिंगची जणू क्रेझच निर्माण झाली आहे. मुला-मुलींना एकट्याने देशभरात आणि परदेशात फिरायला जायला आवडते. हे बजेटफ्रेंडली देखील आहे आणि वेगळा अनुभव देणारे आहे. परंतु, एकट्याने प्रवास करणाऱ्या लोकांनी काही गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
खास करून तरूणींनी, कारण प्रत्येक ठिकाण हे सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगले असेलच असे नाही. जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये चेक-इन करता तेव्हा, हॉटेल स्टाफच्या कर्मचाऱ्यांची एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. ही चूक छोटी असली तरी मुलींना याचा मोठा त्रास होऊ शकतो. मागील काही दिवसांपूर्वीच एका प्रसिद्ध महिला सोलो ट्रॅव्हलरलने याबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली आहे.