सर्वात महागडे लग्न म्हणून प्रसिद्ध झालेलं अनंत आणि राधिका मर्चंट यांचा विवाह तीन महिन्यांपूर्वी पार पडला आहे. विवाह सोहळा पार पडल्यापासूनच अंबानी कुटुंबाची धाकटी सून राधिका हिच्यावर गिफ्टचा वर्षाव होत आहे.
नुकतेच सासूबाई नीता अंबानी यांनी १००-२०० नव्हे तर तब्बल 640 कोटींचा एक व्हिला आपल्या लाडक्या सुनबाईला गिफ्ट केला आहे. त्यामुळे ही सासू-सुनेचे प्रेमळ जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (Relationship Tips )
राधिका आणि नीता अंबानी यांची ही गोष्ट देशातील प्रत्येक महिलेला खटकलेली असणार आहे. कारण खऱ्या आयुष्यात सासूबाईंकडून एखादी गोष्ट गिफ्ट मिळणं म्हणजे दिवास्वप्नच आहे. त्यामुळे अनेक महिलानी त्यांच्या सासूला गमतीने टोमणेही मारले असतील.
पण तुम्हाला सासूबाईकडून इतकं महागडं नाही पण छोटसं गिफ्ट मिळावं असं वाटत असेल. तर तुम्हाला काही गोष्टी करणे गरजेचे आहे. त्या गोष्टी काही महागड्या नाहीत त्या फक्त तुमच्या स्वभावातल्या आणि तुमच्या दोघींच्या नात्यातल्या आहेत. या गोष्टी कोणत्या हे पाहुयात
सासु सुनेचं नातं वळवेल तसं वळतं. आपण निभाऊ तसं टिकतं आणि आपण राहू तशी समोरची व्यक्तीही राहते. हे एकच सूत्र आपण लक्षात घेतलं पाहिजे. जसे तुम्ही तुमच्या पतीला वेळ देता तसा तुम्ही तुमच्या सासूला देता का. याच काही किरकोळ गोष्टी तुम्हाला दोघींना एकत्र आणतील.
तुम्ही सासरी गेल्यानंतर सर्वात आधी तुमच्या आईला मिस करत असतात. तिने सांगितलं प्रत्येक शब्द तुम्हाला आठवत असतो. जशी तुमची आई तुमच्यासाठी स्पेशल आहे. तसे सासूला ही स्पेशल बनवा. यासाठी फार काही नाही तर तिच्याशी मैत्री करा.
कॉलनीतील इतर महिलांचे गॉसिप्स सासूला नक्की शेअर करा. जेवणात काय बनवायचं हे विचारून घ्या. आजारपणात तिची काळजी घ्या. तिच्यासोबत फिरायला, शॉपिंगला जा. तुम्ही तिच्याशी इतक्या मोकळेपणाने वागाल तितकेच तिचे तुमच्याशी असल्या नाते अधिक घट्ट होईल.
तुम्ही तुमच्या आईशी न बोलता राहू शकता का? नाही, काहीतरी वाद किंवा गैरसमज झाले असतील तर ते तुम्ही लगेच दूर करता. पण सासुवरचा राग लगेच जात नाही. त्यामुळे तो फार काळ टिकणार नाही याची काळजी घ्या. सासूचा राग दूर करण्याचा प्रयत्न करा. तसेच त्या विषयावरती मोकळेपणाने बोलल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होतील आणि तुमच्यातील गैरसमज दूर होतील.
जर एखाद्या गोष्टीचा विचार करून तुमची सासू किंवा सून हैराण झाली असेल. तर तिला एकट न सोडता तिच्यासोबत बोला. तिच्या मनात सुरू असलेला गोंधळ शांत करा. काहीतरी तोडगा निघतो का यावर चर्चा करा. कारण एक वेळ तुम्ही त्यांना आनंदाच्या वेळी विसरलात तरी चालेल पण एखाद्या गंभीर प्रसंगी नक्कीच त्यांची सोबत करा.
तुम्ही हे समजून घ्या की तुमच्या घराला शांत ठेवण्याचं काम केवळ तुम्ही दोघी करू शकता. सध्या अनेक सासू-सुनांमध्ये खटके उडतात, वाद होतात. काही सुना तर सासूपासून लांब जातात. पण तुम्ही भांडत असाल तर त्याचा परिणाम फक्त तुमच्यावर नाही तर घरावरतीही होतो. घरातील वातावरण शांत ठेवायचं की ते वादळी बनवायचं हे तुमच्याच हातात आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच या गोष्टींचा विचार करा.
तुमची सासु किंवा सून कशी ग्रेट आहे हे सांगा. सोनू किंवा सासूच कौतुक चार चौघात कमीच होतं. तर माझी सासु कशी वाईट आणि माझी सून कशी वाईट याचीच अधिक चर्चा असते. तुम्ही तसं करू नका. मैत्रिणींना मुद्दाम सासूला भेटवा आणि सासूचे कौतुक करा. सासुबाई नसत्या तर मी बाहेर जॉब करू शकले नसते. सुन नसती तर मी बाहेरचं कुठलंही काम करू शकले नसते. अशी वाक्य मुद्दाम म्हणा. तिच्या मनाला नक्कीच बर वाटेल.
सासूसमोर असेल किंवा तिच्या माघारी तुम्ही तिचा आदर केला पाहिजे. तिचं काही गोष्टी चुकत असतील तर तुम्ही नक्कीच तिला सांगू शकता त्याच्यात त्या बदल करेल. पण तिला नाव ठेवून तिच्यावर वाईट शब्द बोलून ती सुधारणार नाही. तुम्ही तिचा आदर करून बोला आणि तिच्या गोष्टी सुधारण्यासाठी तर तिच्याशी स्पष्ट बोला.
तुम्ही एखाद्या पार्टीला जाताना गिफ्ट घेऊन जाता. काही दिवसांनी जेव्हा तुमच्या घरात कार्यक्रम असतो तेव्हा ते गिफ्ट दिलेलं कुटुंबिय पुन्हा तुमच्यासाठी गिफ्ट घेऊन येतं. तसेच, तुम्ही सासू किंवा सुनेला गिफ्ट दिलं तर तुम्हालाही अपेक्षित असलेलं गिफ्ट मिळेल. अगदी महागडं नाही तर परवडेल असं सासू-सुनेला आवडेल असं गिफ्ट नक्कीच देऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.