कोरड्या केसांची निगा राखण्यासाठी या पाच टिप्स वापरा; पार्लरमध्ये जाण्याची गरज लागणार नाही!

some tips to repair dry and damaged hair
some tips to repair dry and damaged hair
Updated on

कोल्हापूर - ज्यावेळी बाहेरून केसांचे बाहेरील थर किंवा क्यूटिकल्सला हाणी पोहोचते तेव्हा केस कोरडे आणि तुटलेले दिसतात. अनेक कारणांमुळे असे होऊ शकते. सतत केस धुणे, सूर्यावरील ओव्हरेक्स्पोजर, केसांच्या स्टाईलिंग उत्पादनांचा वापर, क्लोरीनयुक्त पाणी आणि धूम्रपान इत्यादींशी संपर्क आल्यानंतर केसांच्या समस्या उदभवू शकतात. परंतु, अशा समस्यांना घाबरण्याची गरज नाही. घरगुती उपाय करूनही तुम्ही या समस्येतून मुक्त होऊ शकता.  
 
 केसांचा सीरम वापरा
जर तुम्हाला खरोखरच केस कोरडे व निर्जीव होण्यापासून वाचवायचे असतील तर हेअर सीरम नेहमीच्या वापरात असावा. हे हीट स्टाईलिंग दरम्यान केसांचे संरक्षण करते.   सीरम नेहमी आपल्या केसांवर आणि केसांच्या टोकांवर लावावे.  
 

तेल बनवेल संजीवनी बूटी
तुमचे केस तुटतात व ते निर्जिव होत असतील तर त्यासाठी तेलाचा वापर करा. केसांमध्ये ऑलिव्ह ऑईल, नारळ, बदाम, कॉर्न तेल यासारखे तेल वापरा. या तेलात  व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडेंट असतात. जे केसांच्या बाहेरील थरातील ओलावा पुन्हा जिवंत करतात. 


कृती
अर्धा कप तेल गरम करा आणि त्याने केसांना हळूहळू मालिश करा. त्यानंतर तीस ते चाळीस मीनिट केस तसेच मोकळे सोडा आणि शैम्पूने चोळा. यामुळे तुमचे केसे मजबूत आणि चमकदार होतील. 

 हुशारीने निवडा केसांची उत्पादने 
आपण आपल्या केसांसाठी कोणते उत्पादन निवडता हे खूप महत्वाचे आहे. कारण जर चुकीचे उत्पादन निवडले तर तुमच्या केसांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे उत्पादन  निवडतावा काळजी घ्या. केस गळणे हे केसांच्या कोरडेपणाचे एक मुख्य कारण आहे. त्यामुळे तुम्ही हायड्रेटिंग शैम्पू, कंडिशनर, मास्क आणि लीव्ह-इन उत्पादन वापरू शकता. यामुळे केसांमध्ये आर्द्रतेची पातळी वाढेल. 
 
 थोडं कोमल व्हा

खराब झालेल्या केसांना व्यवस्थित करायचे असेल तर तुम्हाला थोडे कमल म्हणजेच सौम्य व्हावे लागेल. योग्य पद्धतीने केसे धुणे आणि त्याची काळजी घेणे हे केसांची निगा राखण्याचा पहिला नियम आहे. परंतु, खराब झालेल्या केसांकी निगा कराखण्यासाठी थोडी कोमल, सल्फेट्स, पॅराबेन्स, अल्कोहोल, रंगद्रव्ये असरारी उत्पादने. याबरोबरच कृत्रीम उत्पादनापासून सावध राहा. 

आहाराकडेही लक्ष द्या
साधारणपणे महिला खराब केसांना चांगले करण्यासाठी फक्त त्यांची निगा राखतात. परंतु, तुमच्या केसांची चमक वाढवायची असेल तर तुम्हाला आहाराकडेही लक्ष दिले पाहिजे. तुमच्या आहारात ओमेगा -3 आणि अँटीऑक्सिडेंटचे सेवन वाढवा.  तुम्ही मांसाहारी असल्यास समुद्री खाद्यांना  आहाराचा एक भाग बनवा. सागरी प्राण्यांमधील प्रथिने केस जाड आणि चमकदार ठेवतात. कोरड्या आणि खराब झालेले केसांसाठी  ओमेगा -3 असलेले सॅल्मन, सार्डिन, टूना आणि ऑयस्टर अपयोगी ठरतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.