Sonakshi Weight loss: कधी काळी गोलू-मोलू दिसणाऱ्या सोनाक्षीने 'असे' कमी केले वजन

Sonakshi Weight loss: लठ्ठपणामुळे बॉडी शेमिंगला सामोरे लागणाऱ्या सोनाक्षीने ३० किलो वजन कमी करण्यासाठी कोणते उपाय केले हे जाणून घेऊया.
Sonakshi Weight loss:
Sonakshi Weight loss:Sakal
Updated on

बहुचर्चित बॉलिवूड कपल सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल लग्नबंधनात अडकले आहेत. रविवारी (23 जून) सोनाक्षी आणि झहीर यांनी स्पेशल मॅरेज ऍक्टच्या अंतर्गत त्यांनी लग्न केले. सोनाक्षीच्या घरी त्यांनी कायदेशीर औपचारिकता पूर्ण केली. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाचे सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये हे विवाहित जोडपे खूपच सुंदर दिसत आहे.

दबंग चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणाऱ्या रज्जोने वजन कमी करण्यासाठी खुप मेहनत घेतली आहे. कारण बॉलिवूडमध्ये येण्यापुर्वी तिचे वनज ९० किलो होते. सोनाक्षीने एका मुलाखती सांगितले होते की लठ्ठपणामुळे तिला घरी बॉडी शेमिंगला सामोरे जावे लागले. त्याची आई पूनम सिन्हा तिला नेहमी वजन कमी करण्यास सांगत असे. तिने सांगितले की, लठ्ठपणामुळे शाळेतील मुले तिला वेगवेगळ्या नावाने चिडवत असत.

बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी सोनाक्षीचे वजन 95 किलो होते. दबंग या पहिल्या चित्रपटासाठी तिने ३० किलो वजन कमी केले होते.

सोनाक्षीने सांगितले की जेव्हा तिचे वजन जास्त होते तेव्हा ती जिममध्ये ट्रेडमिलवर 30 सेकंदांपेक्षा जास्त वेळ उभी राहू शकत नव्हती. तिला चित्रपटात यायचे होते म्हणून वजन कमी करण्याचा निर्णय घेतला नाही तर तिला वजन कमी करणे गरजेचे होते.

सोनाक्षीने सुरुवातीला जीम जॉईन केली होती पण ती पुढे चालू ठेवू शकली नाही. तिने व्यायामाचे पर्याय निवडले जे सोपे होते. पिलेट्स त्यापैकी एक आहे. ती रोज सकाळी रिकाम्या पोटी 30-45 मिनिटे कार्डिओ करायची आणि नंतर 20 मिनिटे ब्रिस्क वॉकिंग करायची.

सोनाक्षी सुरुवातीपासूनच फूडी आहे आणि हेच तिचे वजन वाढण्याचे कारण होते. तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात, तिने निरोगी आहाराची विशेष काळजी घेतली आणि उच्च-प्रथिने आणि कमी कार्बोहायड्रेट आहार घेण्यास सुरुवात केली. याशिवाय ती दिवसभर भरपूर पाणी प्यायची. चयापचय सुधारण्यासाठी तिने एकाच वेळी भरपूर खाण्याऐवजी दर 2 तासांनी थोडेसे जेवण घेणे सुरू केले. याशिवाय, ती रात्रीचे जेवण लवकर करत होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.