Sonakshi Sinha Nailart : सोनाक्षीचे ‘हे’ नेलआर्ट डिझाईन्स नक्की करा ट्राय, तुमचे हात दिसतील अधिक आकर्षक

Sonakshi Sinha Nailart : उत्तम अभिनयासोबतच सोनाक्षी तिच्या नेलआर्टसाठी आणि स्टायलिश लूकसाठी खास करून ओळखली जाते.
Sonakshi Sinha Nailart
Sonakshi Sinha Nailartesakal
Updated on

Sonakshi Sinha Nailart : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या लग्नामुळे मागील काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. सोनाक्षी आणि तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बाल एकमेकांसोबत आज विवाहबंधनात अडकणार आहेत. १-२ दिवसांपूर्वी तिचे मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. आता चाहत्यांना तिच्या लग्नाची उत्सुकता निर्माण झाली आहे.

आपल्या उत्तम अभिनयासोबतच सोनाक्षी तिच्या नेलआर्टसाठी आणि स्टायलिश लूकसाठी खास करून ओळखली जाते. तिला नेलआर्टची प्रचंड आवड आहे. तिचा नेलआर्टचा स्वत:चा एक ब्रॅंड देखील आहे.

आज आपण सोनाक्षी सिन्हाच्या काही गाजलेल्या नेलआर्ट लूक्सबद्दल जाणून घेणार आहोत. जे तुम्ही कोणत्याही कार्यक्रमासाठी आणि पार्टीसाठी ट्राय करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात सोनाक्षीच्या नेलआर्ट डिझाईन्सबद्दल.

Sonakshi Sinha Nailart
Bridal Makeup : ब्रायडल मेकअपचे नेमके प्रकार किती? लग्नासाठी मेकअप आर्टिस्ट बुक करण्यापूर्वी घ्या जाणून

स्टोनवर्क नेलआर्ट डिझाईन

सोनाक्षीच्या हातांवर यापूर्वी अनेक प्रकारच्या नेलआर्ट डिझाईन्स दिसून आल्या आहेत. त्यापैकी तिचे हे स्टोनवर्क नेलआर्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. ही नेलआर्ट डिझाईन पार्टीसाठी एकदम परफेक्ट आहे.

Sonakshi Sinha Nailart
Sonakshi Sinha Nailartinstagram

जर तुम्हाला पार्टीला किंवा कोणत्याही कार्यक्रमाला ग्लॅमरस लूक करायचा असेल तर तुम्ही हे नेलआर्ट ट्राय करू शकता. या नेलआर्टमध्ये विविध प्रकारच्या खड्यांचा वापर केला जातो. तुम्ही यासाठी सिंगलस्टोन देखील वापरू शकता. या प्रकारचे नेलआर्ट करण्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये २००० ते २५०० मोजावे लागतील.

शिमर नेलआर्ट

शिमर नेलआर्ट  ही डिझाईन तरूणींमध्ये सध्या भलतीच चर्चेत आहे. जर तुम्ही कोणताही स्टायलिश लूक करणार असाल, तर त्यावर ही नेलआर्ट डिझाईन छान सूट होईल. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या रंगानुसार किंवा आऊटफीट्च्या रंगानुसार हे शिमर नेलआर्ट ट्राय करू शकता.

Sonakshi Sinha Nailart
Sonakshi Sinha Nailartinstagram

सोनाक्षीने हे नेलआर्ट शरार सूटवर ट्राय केले आहे. जे तिच्या हातांवर खुलून दिसत आहे. तुम्ही देखील या प्रकारचे नेलआर्ट करू शकता. यासाठी तुम्ही मॅट किंवा जेल फिनिशिंगचा वापर करू शकता.

मल्टीकलर नेलआर्ट

आजकाल मल्टीकलर नेलआर्टची तरूणींमध्ये मोठी क्रेझ पहायला मिळते. शिवाय, या प्रकारचे नेलआर्ट सर्व प्रकारच्या आऊटफीट्सवर सहज मॅच होते. यासाठी तुम्ही तुमच्या आवडीचे रंग नेलआर्टसाठी निवडू शकता.

Sonakshi Sinha Nailart
Sonakshi Sinha Nailartinstagram

सोनाक्षीने या प्रकारचे मल्टीकलर नेलआर्ट तिच्या नखांवर केले आहे. यामुळे, तिच्या हातांना एक वेगळाच लूक मिळाल्याचे दिसून येत आहे.

Sonakshi Sinha Nailart
Nail Polish Tips : नखांना सुंदर बनवण्यासोबतच 'या' कामांसाठी नेलपॉलिशचा करा वापर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.