अजबच! मासिक पाळीचं रक्त त्वचेवर लावते, म्हणे आरोग्यासाठी हितकारक

जस्मिन अॅलिसिया कार्टर असे तिचे नाव असून ती मासिक पाळीत असलेल्या अंतर्भूत पवित्रतेला समजून घेण्यासाठी प्रशिक्षण देते
jasmin carter use periods blood for skin care
jasmin carter use periods blood for skin careinstagram
Updated on
Summary

आम्हाला आधीपासूनच मासिक पाळीची लाज बाळगण्यास शिकवले गेले आहे, ते चुकीचे आहे., असे जस्मिन सांगते. स्त्रियांचे रक्त लपवण्यासाठी आणि मासिक पाळीच्या नैसर्गिक कार्याशी तडजोड करणारी रसायने टॅम्पन्स आणि पॅडमध्ये असतात. असा दावाही तिने केला आहे. म्हणूनच ती हा दोष कमी करण्यासाठी मासिक पाळीचे रक्त पिते. त्यामुळे तिला खूप फायदा झाल्याचे सांगितले आहे.

पाळीविषयी आपल्या समाजात अनेक समज-गैरसमज आहेत. समाजात पाळीविषयी म्हणावी तितकी जागरूकताही (Awerness) नाही. पण मासिक पाळीबाबत (Periods) एका स्पॅनिश महिलेने (Women) एक वेगळाच दावा केला आहे. ती मासिक पाळीचे रक्त त्वचेवर (Skin) लावते. तसेच हे रक्त आरोग्यासाठी हितकारक असल्याचा दावाही तिने केला आहे. मात्र ही पद्घत शास्त्रज्ञांना अतिशय चुकीची वाटते आहे.

३० वर्षांच्या जस्मिन अॅलिसिया कार्टरने न्यूज डॉग मीडियाला याबाबत माहिती दिली आहे. ती म्हणते, तुमच्या मासिक पाळीचे रक्त म्हणजे शुद्ध औषध आहे. तिने या रक्तामुळे काय फायदे होतात हेही सांगितले आहे. तिचे इंस्टाग्रामवर 22,800 फॉलोअर्स आहेत. तर TikTok वर 12,300 फॉलोअर्स आहेत.

jasmin carter use periods blood for skin care
लसीकरणानंतर मासिक पाळी थोडी उशीरा येऊ शकते: संशोधनाचा निष्कर्ष
jasmin with period blood
jasmin with period bloodesakal

कार्टर काय म्हणते?

कार्टर महिलांना मासिक पाळीत असलेल्या अंतर्भूत पवित्रतेला समजून घेण्यासाठी आणि पुन्हा मिळविण्यासाठी महिलांना प्रशिक्षण देते. ती म्हणते आम्ही येथे आमच्या योनीमुळे आलो आहोत. त्यामुळे त्याचे पुरेसे श्रेय आमचे रक्त आणि स्त्रिया घेत नाही. कारण, आम्हाला आधीपासूनच मासिक पाळीची लाज बाळगण्यास शिकवले गेले आहे, ते चुकीचे आहे., असे कार्टर सांगते. स्त्रियांचे रक्त लपवण्यासाठी आणि मासिक पाळीच्या नैसर्गिक कार्याशी तडजोड करणारी रसायने टॅम्पन्स आणि पॅडमध्ये असतात. असा दावाही तिने केला आहे. म्हणूनच ती हा दोष कमी करण्यासाठी मासिक पाळीचे रक्त पिते. त्यामुळे तिला खूप फायदा झाल्याचे सांगितले आहे.

jasmin carter use periods blood for skin care
महिलांनो,Menstrual Cup कधी वापरू नये, जाणून घ्या
periods blodd for skin
periods blodd for skin

रक्ताचा उपयोग करते अशाप्रकारे

जास्मिन म्हणते, की मासिक पाळीच्या रक्तात प्रथिने, लोह आणि स्टेम सेल्स यांसारखे पोषक घटक असतात. मी कप वापरून हे रक्त एकत्र करते. त्यानंतर एक घोट ते पिते. पण मला कधीकधी ते किती प्यावे हे कळत नाही. जेव्हा मला जास्त पोषक तत्वे हवी असतात तेव्हा तो संपूर्ण कपही पिते. हे रक्त मी चेहऱ्यावर लावते. पण, जेव्हा पहिल्यांदा माझ्या चेहऱ्यावर मासिक पाळीचे ताजे रक्त लावले तेव्हा खूप नैसर्गिक वाटले, त्वचेवर अतिशय ताजेतवाने आणि थंडावा देणारी भावना होती ती. त्यानंतर मला कधीही त्वचेच्या मोठ्या समस्या आल्या नाहीत. पण,, या पीरियड फेस मास्क माझी त्वचा आता उत्तम दिसते आहे, असे मला वाटते.

jasmin carter use periods blood for skin care
महिलांनो, PCOS त्रास होतोय? आहारात खा 'या' सुपर सीड्स
periods blood painting
periods blood painting

या रक्ताचा उपयोग करून जस्मिन चित्रही काढते. तिने सोशल मीडियाद्वारे याविषयी खूप जनजागृती केली आहे. तसेच सातत्याने ती याविषयी मार्गदर्शन करते. कार्टर सांगते माझ्याप्रमाणे प्रत्येकाने त्यांच्या मासिक पाळीवेळी असे करावेच, अशी माझी अपेक्षा नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()