Sphatik Stone : घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करते, कशी वाचा...

वास्तूशास्त्रानुसार घरात स्फटिक असणे शुभ असते.
sphatik stone effects
sphatik stone effects
Updated on
Summary

वास्तूशास्त्रानुसार घरात स्फटिक असणे शुभ असते.

कोणत्याही घरात आनंदाने राहण्यासाठी त्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह असायला हवा. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करण्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगितले आहेत. त्यापैकी एक म्हणजे स्फटिकचा वापर करणे. वास्तूशास्त्रानुसार घरात स्फटिक असणे शुभ असते. स्फटिकाच्या मदतीने घरातील बिघडलेली वास्तू दुरुस्त होऊ शकते. यासाठी एका स्फटिक बॉलचा वापर केला जातो. जो घराच्या पूर्वेकडील भागात ठेवला जातो, जेथे सूर्यप्रकाश येतो.

sphatik stone effects
Experts : भातप्रेमींसाठी महत्वाची बातमी, शिळा भात खावा का ताजा? आहारतज्ज्ञ काय सांगतात पहा..

स्फटिकाचे लाभ

  • स्फटिक हा कोणत्याही सजीव प्राणी, झाड किंवा रोप यांच्या संपर्कात आल्यास त्या प्राणी किंवा वस्तुमध्ये सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते.

  • जे नकारात्मक ऊर्जेने भरलेले असतात त्यांना स्फटिक सुरक्षा देते. यापासून शुद्ध ईश्वरी ऊर्जा मिळू शकते.

  • शरीरातील सात चक्रांना संतुलित करुन त्यांना शुद्ध करण्याचे आणि त्यांची कार्यक्षमता वाढवण्याचे काम स्फटिक करत असतात.

  • आपल्या शांत स्वभवामुळे स्फटिक मन, रोग आणि भावनांच्या उद्वेगापासून शांत आणि आरोग्याचे लाभ प्रदान करत असतो.

स्फटिक वातावरण, माणूस आणि प्राण्यांच्या जागेतील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो. त्यामुळे वेळोवेळी त्याला शुद्ध करणे गरजेचे असते. अन्यथा तो आपला पूर्ण प्रभाव दाखवू शकत नाही. २४ तासांतून एकदा त्याला एकदातरी समुद्राच्या पाण्याने किंवा मीठाच्या पाण्याने स्वच्छ करणे आवश्यक आहे. यानंतर स्फटिकाला स्वच्छ कपड्याने पुसून आपल्या डाव्या हातावर ठेवावे. हातावर ठेवताच स्फटिक शुद्ध झाला ही भावना मनात आणल्यानंतर तो शुद्ध होईल.

sphatik stone effects
White Hair : पांढऱ्या केसांच्या समस्येला करा दूर; ट्राय करा घरगुती उपाय, वाचा कोणते?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.