Healthy Breakfast Recipe: मधुमेही रूग्णांसाठी परफेक्ट नाश्ता आहे हा स्प्राऊट्स ढोकळा, कसा बनवायचा ते पहा!

Sprouts And Spinach Dhokla Recipe : तुम्हाला मधुमेह आणि रक्तातील साखर दोन्ही नियंत्रणात ठेवून काही पदार्थ खायची इच्छा होत असेल तर तुम्ही ढोकळा खाऊ शकता.
brekafast recipe
brekafast recipe esakal
Updated on

Sprouts And Spinach Dhokla Recipe :

आजकाल घरातील एखादा तरी व्यक्ती मधुमेहाने ग्रस्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेने काही दिवसांपूर्वीच धोक्याचा इशारा दिला आहे, की लवकरच अशी वेळ येईल की अर्ध जग मधुमेहाच्या विळख्यात अडकणार आहे. कारण, मधुमेहासारखा आजार झपाट्याने वाढत आहे.

मधुमेह ही आजच्या काळातील एक गंभीर समस्या आहे. मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. मधुमेही रूग्णांना खास पदार्थच खायला दिले जातात. कारण, त्यांच पथ्य-पाणी वेगळं असतं.

brekafast recipe
Corn Upma Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा स्वादिष्ट कॉर्न उपीट, नोट करा रेसिपी

जेव्हा शरीरात पुरेसे इंसुलिन तयार होत नाही किंवा इन्सुलिनचा योग्य वापर करता येत नाही तेव्हा मधुमेह होतो. मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखरेच्या पातळीकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. जर तुम्हाला मधुमेह आणि रक्तातील साखर दोन्ही नियंत्रणात ठेवून काही पदार्थ खायची इच्छा होत असेल तर तुम्ही ढोकळा खाऊ शकता.

अंकुरीत मूग अन् पालकचा ढोकळा

अंकुरित मूग डाळ, अँटिऑक्सिडेंट्स व्यतिरिक्त, फायबर आणि प्रथिने देखील समृद्ध आहे, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते आणि पोट जास्त काळ भरलेले ठेवते. कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेला हा ढोकळा मधुमेहाच्या रुग्णांसाठी उत्तम नाश्ता आहे.

brekafast recipe
Diwali Recipe :  दिवाळीच्या आठवडाभरातही मऊसूत राहतील असे नारळीपाकाचे लाडू नक्की ट्राय करा

साहीत्य -

अंकुरलेले मूग - 2 कप

पालक २ कप

मीठ - २ टीस्पून

हिरवी मिरची (चिरलेली) – २

बेसन - 2 चमचे

फ्रूट सॉल्ट - 1 टीस्पून

हिंग - 1 टीस्पून

कढीपत्ता - 3-4 पाने

हिरवी मिरची- 1 (फोडणीसाठी)

जिरे- 1 टीस्पून

तेल

brekafast recipe
Diwali Recipe : तोंडात लगेचच विरघळणाऱ्या खुसखुशीत सुक्या खोबऱ्याच्या करंज्या कशा बनवायच्या पहा!

कृती  

सर्वात आधी मिक्सरमध्ये थोडेसे पाणी घालून अंकुरलेले मूग, पालक आणि मिरची बारीक करून पीठ तयार करा. हे पीठ एका भांड्यात काढून त्यात थोडेसे पाणी घालून मीठ आणि बेसन घाला म्हणजे पीठ स्थिर होईल.

आता फ्रूट सॉल्ट घालून मिक्स करा. आता एका भांड्याला थोडे तेल लावून घ्या. त्यात पीठ घाला एकसारखे पसरून घ्या. ने मिश्रणांचे भांडे मोठ्या भांड्यातील पाण्यात ठेऊन 10-12 मिनिटे वाफवून घ्या. शिजल्यावर त्याचे चौकोनी तुकडे करावेत.

तडका बनवण्यासाठी कढईत तेल गरम करून त्यात हिरवी मिरची, जिरे, कढीपत्ता आणि हिंग घाला. थोडा वेळ तळून घ्या. ढोकळ्यावर ओतून हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा. लहान मुलांसाठीही हा ढोकळा चांगला आहे. कारण, हे खाऊन त्यांच्या कॅलरीज वाढत नाहीत. त्यामुळे हे फायद्याचे ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.