which rice is good for health says food experts
which rice is good for health says food experts

Experts : भातप्रेमींसाठी महत्वाची बातमी, शिळा भात खावा का ताजा? आहारतज्ज्ञ काय सांगतात पहा..

सगळ्यांच्या आवडत्या भाताबद्दल मात्र नेहमीच वेगवेगळ्या गप्पा रंगत असतात.
Published on
Summary

सगळ्यांच्या आवडत्या भाताबद्दल मात्र नेहमीच वेगवेगळ्या गप्पा रंगत असतात.

अनेकांचा भात हा पदार्थ खूप आवडता आहे. भात म्हणजे प्रेम असे माननारे बरेच लोक आपल्या संपर्कातही असतात. गरमगरम तुप- मीठ-भात, वरण भात, ताक भात आवडीने खाणारे अनेकजण आपण पाहिले असतील. हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात रात्रीच्या जेवणात असलेला गरमागरम मेतकुट भात आणि तुपाची धार असा आवडीने भात खाणारेही बरेच आहेत. (which rice is good for health says food experts)

बऱ्याच भातप्रेमींना काही हटके खाण्याचा मोह आवरत नाही. पण सगळ्यांच्या आवडत्या भाताबद्दल मात्र नेहमीच वेगवेगळ्या गप्पा रंगत असतात. वजन वाढते या कारणामुळे अनेकजण भातपासून दूर राहतात. किंवा भात खाणार नाही असा निश्चय करतात. भात खाल्ल्याने शुगर वाढते, रात्रीच्या वेळी भात खाऊच नये, असे बऱ्याचवेळा सांगितले जाते. मात्र एका आहारतज्ज्ञांनी भाताबद्दल एक विशेष माहिती दिली आहे.

which rice is good for health says food experts
वास्तूशास्त्रानुसार तुमच्या घरातील वस्तूंची जागा योग्य ठिकाणी आहे?

आहारतज्ज्ञ पुजा माखिजा यांनी त्यांचा एक व्हिडिओ नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये मधुमेह आणि पीसीओएस असा त्रास असेल, तर कशा पद्धतीने भात खावा, हे सांगितलं आहे. अनेकवेळा भात कसा खावा हा प्रश्न भातप्रेमींकडून विचारला जातो. मात्र पूजा यांनी यावर सोपं उत्तर दिलं आहे.

पुजा माखिजा यांच्या मते तयार झालेला भात जेव्हा थंड होत जातो, तेव्हा त्यासोबत नैसर्गिकपणे एक क्रिया होते. त्याला स्टार्च रेट्रोग्रेडेशन असं म्हणतात. या प्रक्रियेतून रेझिस्टन्स स्टार्च तयार होतात. शिजवलेला भात, उकडलेले बटाटे जेव्हा आपण थंड होतात, तेव्हा त्यातले डायजेस्टिव्ह स्टार्च हळूहळू रेझिस्टन्स स्टार्चमध्ये रुपांतरीत होत जातात.

डायजेस्टिव्ह स्टार्च असे असतात की आपलं शरीर त्यांना सहजपणे ब्रेकडाऊन करतं आणि त्यामुळे त्याचं खूप लवकर ग्लुकोजमध्ये रुपांतर होतं. रेझिस्टीव्ह स्टार्च बॉडीला लवकर ब्रेकडाऊन करता येत नाहीत, त्यामुळे त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. रेझिस्टिव्ह स्टार्च शरीरासाठी घातक नसतात. उलट गट हेल्थ सुधारण्यासाठी प्रो बायोटीक म्हणून ते ओळखले जातात. त्यामुळे ताज्या भातापेक्षा शिळा भात खाणं मधुमेह आणि पीसीओएस (PCOS) त्रास असणाऱ्यांसाठी चांगलं आहे, असं पुजा यांचं म्हणणं आहे.

which rice is good for health says food experts
Chanakya Niti : घर घेताना चाणक्याच्या या चार ट्रिक्स फॉलो केल्या नाहीतर...

कशा पद्धतीने खावा शिळा भात?

आधी शिजवलेला भात फ्रिजमध्ये ठेवून त्यानंतर तो तब्बल २४ तासांनी खाल्ला तरी चालतो, असं पुजा यांचं म्हणणं आहे. फ्रिजमधून काढलेला भात आधी सामान्य तापमानावर येऊ द्यावा. त्यानंतर तो गरम करावा आणि मगच खावा, अंसही त्यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.