निष्पक्ष, तथ्यांवर आधारित आणि दर्जेदार बातम्या वाचण्याबरोबर आता सकाळच्या वाचकांसाठी आम्ही तुमच्यातील हुशारीला चालना मिळेल यासाठी काही ऑनलाईन गेम्स आणि कोडी घेऊन आलो आहोत. दैनिक सकाळमधल्या डोकं-कोडी पुरवणीत तुम्हाला ही कोडी खेळता येतीलच पण हीच कोडी तुम्हाला आमच्या वेबसाईटवर अर्थात ई-सकाळवरही खेळता येईल.
कुठले गेम्स आणि कोडी खेळता येतील?
'डोकं चालवा, कोडे सोडवा!' या सेक्शनमध्ये तुम्हाला विविध गेम्स खेळता येतील. यामध्ये मिनी कोडं, शब्द कोडं, चित्र कोडं, चित्र स्मरण, प्रतिमा ओळख आणि रोल डायस हे खेळ उपलब्ध आहेत. ही कोडी किंवा गेम्स खेळल्यानंतर तुम्हाल ते कसं वाटलं, खेळताना तुम्हाला कसं फील झालं याचा फिडबॅकी तुम्हाला वेबसाईटवर नोंदवता येईल, ज्यामुळं आम्हाला हे खेळ तुमच्यासाठी अधिक रंजक, डोक्याला चालना देणारं आणि इंटरॅक्टिव्ह करता येतील.
चित्रकोड्यांमध्ये तुम्हाला अनस्क्रॅम्बल, असेम्बल, रिव्हिल या कोड्यांचे ऑप्शन उपलब्ध आहेत. तर 'चित्र स्मरण' या खेळात स्मृतीशक्तीचा खेळ, मनोरंजनाची धमाल तुम्हाला अनुभवायला मिळेल तर 'प्रतिमा ओळख' या गेममध्ये रहस्य उघड करा, प्रतिमेचा अंदाज लावण्यासारखे चॅलेंजिंग गोष्टीही तुम्हाला खेळता येतील. त्याबरोबर 'रोल डायस'मध्ये तुमचं लक आणि टॅलेंट तपासलं जाईल यामध्ये कोण जिंकणार याची उत्सुकता तुम्हाला वेगळाच थरारक अनुभव मिळवून देईल.
अशा प्रकारे मराठी न्यूज पोर्टलसाठी पहिल्यांदाच अशा प्रकारचा विविध ऑनलाईन खेळांचा अनुभव तुम्हाला घेता येईल. यातून तुमचं नॉलेज तसंच तुमची तर्कशक्ती वाढण्यास मदत होईल. सकाळनं केलेला हा नवा प्रयोग तुम्हाला कसा वाटला? हे आम्हाला जरुर कळवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.