Relationship Tips: रिलेशनशिप हा विषय म्हटला की प्रत्येकाच्याच मनात थोडी धडकी ही भरते, आपल या माणसाशी नक्की जुळेल ना? आज जसा समजून घेतो आहे पुढेही असच समोरचा व्यक्ती आपल्याला समजून घेईल ना? बरं या सगळ्यातून पुढे जात नात्याबद्दल घरी सांगण्याची वेळ आली की अनेकदा हिंमत होत नाही.
घरचे नक्की काय म्हणतील? आपल्याला समजून घेतील की नाही? नक्की काय सांगतील? विरोध करतील का? पण जर तुम्ही या टिप्स वापरून घरच्यांना आपल्या रिलेशनशिप बद्दल सांगितलं तर ते नक्कीच तुम्हाला समजून घेऊ शकतात.
तुम्हाला थोडीशी हिंमत दाखवावी लागेल आणि शांतपणे घरच्यांना समजून सांगावं लागेल. या काही महत्त्वाच्या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमचा मुद्दा तुमच्या पालकांसमोर चांगल्या प्रकारे मांडू शकाल.
१. नात्याचे गांभीर्य समजून घेणे गरजेचे आहे
अनेकवेळा जोडपी एक्साइट होऊन पालकांना नात्याबद्दल सांगतात. पण नंतर त्यांच नाते तुटते, ज्यामुळे पालकांनाही धक्का बसू शकतो. शिवाय, तुमच्या निवडीवर परत विश्वास न ठेवणं पालकांना जास्त सोयीच वाटू शकत. त्यामुळे एवढं मोठं पाऊल उचलण्यापआधी आपल्या जोडीदाराशी थेट बोला. त्यानंतरच पालकांना रिलेशनशिपमध्ये असल्याबद्दल सांगा.
२. जोडीदाराशी संवाद खूप महत्त्वाचा आहे
नात्याबद्दल पालकांना सांगण्यापूर्वी तुमच्या जोडीदाराशी चर्चा करा कारण तुमच्या नात्याबद्दल जाणून घेतल्यानंतर तुमच्या पालकांची पहिली प्रतिक्रिया तुमच्या जोडीदाराला भेटण्याची असेल. अशा परिस्थितीत तुम्ही दोघांनीही सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया आणि प्रश्नांसाठी तयार असले पाहिजे.
३. पालकांच्या जवळच्या व्यक्तीशी बोला
बरेच लोक आपल्या पालकांशी थेट बोलायला घाबरतात; अशात तुम्ही त्यांच्या जवळच्या लोकांशी किंवा घरातल्या ताई दादांशी बोलू शकतात, जे तुम्हाला आणि तुमच्या बाजूला नीट समजून घेऊ शकतील आणि पालकांचा मूड असेल तेव्हा त्यांच्याशी बोलू शकतील.
४. प्रश्न आणि उत्तरांसाठी तयार रहा
जेव्हा पालकांना कळत की त्यांची मुल कोणासोबत रिलेशनशिप मध्ये आली आहेत, तेव्हा त्यांच्या मनात खूप प्रश्न पडतात, आणि तर सगळे प्रश्न तर तुम्हाला विचारू शकतात, या प्रश्नांना अजिबात घाबरु नका, धीर धरा आणि शांततेत सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.