Wheat Flour Storage :कितीही काळजी घेतली तरी कणीक काळीच पडते? अशी करा फ्रिजमध्ये स्टोअर!

कणीक फ्रिजमध्ये ठेवताना तुम्हीही करताय या चुका
Wheat Flour Storage
Wheat Flour Storageesakal
Updated on

Wheat Flour Storage : सकाळचा नाश्ता असो अथवा जेवण गरमागरम चपाती ताटात आली की मन अगदी प्रसन्न होतं. मऊ आणि चांगल्या चपाती करण्यसाठी महिलांना बरेचदा वेगवेगळ्या ट्रिक्स वापराव्या लागतात. चपाती हा दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग आहे. पण बरेचदा सकाळच्या घाईगडबडीत कणीक भिजविण्यापासून तयारी करणे त्रासदायक ठरते.

अशावेळी अनेक जणी रात्री कणीक मळून फ्रिजमध्ये ठेवतात आणि सकाळी डब्यासाठी चपाती बनवतात. कणिक शिल्लक असणं हे कधी कधी घाईच्या वेळासाठी अगदी सुरक्षित मार्ग आहे. कारण, अनेकदा कणिक मळून चपाती करणे त्रासदायक आणि वेळखाऊ वाटते.

पण, फ्रिजमध्ये ठेवलेलील कणिक चांगली राहीलच याची काही गॅरेंटी नसते. फ्रिजमधील अस्वच्छता, हवा, थंड वातावरण याचा परिणाम कणकेवर होतो. त्यामुळेच दोन दिवस कणिक ताजीच राहील, असे कोणते उपाय आहेत त्याची आज माहिती घेऊयात.

कणकेत मीठ घालणे

कणिक मळत असताना जेव्हा आपण कोरडं पीठ परातीत घेतो. तेव्हा त्यात दोन चिमूट मीठ घालावे. मीठात असलेले ऍन्टीऑक्सिडंट गुणधर्म पिठात तयार होणारे सुक्ष्म जिवांचा खात्मा करतात. ग्रामीण भागात आजही कणिक मीठ घालूनच भिजवली जाते. पण, काही आरोग्यासाठी जागरूक असलेले जे मिठाचा वापर कमी करतात असे लोक पिठात मीठ घालत नाहीत. त्यामुळे पीठ लगेच खराब होते.

कोमट पाण्याचा वापर करा

अनेकदा घाईघाईत आपण पीठ घेतो आणि चपाती करायला लागतो तर ते वरून चांगलं दिसतं. पण त्याच्या चपाती काळपट पडतात. आणि चवितही फरक पडतो. अशावेळी तुम्हाला तर दोन दिवस कणिक साठवायची असेल. तर, कणिक भिजवण्यासाठी कोमट पाणी वापरा. तुम्ही पाण्याऐवजी दूधही वापरू शकता.

हवा बंद डब्यात ठेवा

कणिक जास्त वेळ ताजी रहावी. असं वाटत असेल तर मळल्यानंतर लगेचच झाकून ठेवावी. आणि फ्रिजमध्ये ठेवणार असाल तेव्हा ती हवाबंद असलेल्या डब्यात ठेवा. ज्यामुळे कणकेला बाहेरी हवा लागणार नाही आणि ती फ्रेश राहील.

तूप किंवा तेल लावा

पीठ मळून झाल्यावर त्यावर थोडे तेल किंवा तूप लावावे. अशा प्रकारे जर तुम्ही तेल किंवा तुपाचा हात लावला आणि ते पीठ फ्रिजमध्ये ठेवले तर पीठ काळे किंवा कोरडे होत नाही. ज्याच्या मदतीने तुम्ही दोन दिवसांनी ताज्या चपात्याही बनवू शकता.

Wheat Flour Storage
Kitchen Tips : Fridge मध्ये ठेऊनही भाज्या खराब कशा होतात? हे घ्या उत्तर

कणीक पाण्यात ठेवा

डायरेक्ट एखाद्या भांड्यात अथवा डब्यात कणीक भरून ठेऊ नका. कणीक फ्रिजमध्ये ठेवण्याआधी एका लहानशा ताटात पाणी घ्या आणि कणीक भरलेला डबा त्यात ठेवा आणि त्यानंतरच फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे कणीक मऊ आणि ताजी राहायला मदत मिळते.

ओले कापड झाका

कणीक मळून झाल्यावर तासाभराने चपाती करणार असाल तर कणकेच्या गोळ्यावर ओले सुती कापड झाका. कणीक उघडी राहिल्यास ती कडक होते आणि चपाती बनवणं कठीण होतं. त्यामुळे कधीही फ्रिजमध्ये कणीक उघडी राहू देऊ नका.

कणीक सहसा फ्रिजमध्ये ठेवणे योग्य नाही. मात्र तुम्ही जर रात्री कणीक भिजवून फ्रिजमध्ये ठेवणार असाल तर वर दिलेल्या हॅक्स वापरून पाहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.