— डॉ. मीनाक्षी बत्तासे, अध्यक्ष, इको ग्रीन फाउंडेशन
उन्हाळ्यात आपण मधुर फळांचा आस्वाद घेतो. आंबा, फणस, पपई, चिकू, संत्री-मोसंबी, करवंद, जांभूळ याशिवाय इतरही बरीच फळे आहेत. हाच आनंद पुढच्या पिढ्यांना देण्यासाठी फक्त खाल्लेल्या फळांच्या बिया साठवा.
साठवलेल्या बिया पर्यावरणावर काम करणाऱ्या संघटनांपर्यंत पोचवा किंवा स्वतः त्या बियांची लागवड करून आनंद घेत निसर्गाचा समतोल राखण्यासाठी हातभार लावा. यामुळे शहराच्या वृक्षगणनेत वाढ होईल आणि वातावरण स्वच्छ व प्रदूषणविरहित होईल, असे आवाहन इको ग्रीन फाउंडेशनने केले.
उन्हाळ्यात भरपूर फळे खाल्ली जातात. फळांच्या बिया फेकून देण्याऐवजी जमा केल्या आणि पावसाळ्यात लावल्या तर पर्यावरण संरक्षणात योगदान देऊ शकतो. प्रत्येक नागरिकांनी बिया जमा कराव्यात. कुणीही अगदी सहज बिया साठवू शकतो, असेही इको ग्रीन फाउंडेशनने सांगितले.
आंब्याच्या कोयी, कडुनिंबाच्या लिंबोळ्या किंवा इतर फळांच्या बिया कोरड्या मातीत किंवा राखेत बुडवून घोळवून वाळवून ठेवाव्यात. त्यामुळे कोयींचा, बियांचा ओलावा शोषला जाईल आणि बुरशी लागणार नाही. राख, माती लावून वाळली की बिया लवकर वाळतात. चिलट माशा होत नाहीत. माती, राख मिळत नसेल तर कोयी, बिया उन्हात व्यवस्थित वाळविता येतात.
आठ दिवसांनंतर कोयी किंवा बिया लावणीसाठी तयार होतात. त्यानंतर आपल्याकडे असलेल्या दुधाच्या पिशव्या, आइस्क्रीमचे कप, फूड पार्सल, श्रीखंडाचे डबे यांना छिद्र पाडून त्यात माती, कोरडा पालापाचोळा भरून त्यात बिया, कोयी मातीत अलगद खोचाव्या व त्या पिशव्या सावलीत ठेवाव्यात.
यात रोज थोडे पाणी घालावे. 15 दिवसांत अंकुर फुटल्यावर हवी तेवढी रोपे तयार होतात. एकदा पाऊस सुरू झाला की मोकळ्या जागी लावता येईल किंवा कुणाला वृक्षारोपणासाठी देता येतात.
आपणच रुजवलेले बीज अंकुरताना पाहणे खूपच आनंद देणारे असते. प्रत्येक कुटुंबाने ठरवले तर बिया साठविता येतील. हवे तर या साठवलेल्या बिया इको ग्रीनकडे दिल्या तर बिया, कोयी रुजवून रोप तयार करून इको ग्रीन मोकळ्या व संरक्षित जागी वृक्षारोपण व संगोपनाची जबाबदारी घेतो. ऑक्सिजनचे मूल्य समजून घेत पर्यावरणाप्रती इतकी जबाबदारी आपण नक्कीच घेऊ शकतो. आम्ही लवकरच जंगलात जाऊन बिया संकलित करणार आहोत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.