Strong Nails Remedies : रेखीव अन् सुंदर नखांसाठीचा बेस्टवाला फॉर्म्युला, फक्त एवढंच करा!

शरीरातील कँल्शियमची कमी असेल तरी नखांवर इफेक्ट होतो
Strong Nails Remedies
Strong Nails Remedies esakal
Updated on

Beauty Tips : आपली नखे सुंदर आणि मजबूत दिसावीत अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्याकरिता प्रत्येकजण काही न काही नखांसाठी उपचार करत असतात. नखे सुंदर दिसण्यासाठी महागडे उपचार घेण्यापेक्षा घरगुती असे काही उपाय आहेत, जे नखांना मजबुती देतात.

मुलगा असो वा मुलगी प्रत्येकजण आपल्या सौंदर्याची विशेष काळजी घेतो. विशेषत: मुली प्रत्येक प्रसंगी परफेक्ट दिसण्यासाठी खूप मेहनत घेतात. लेटेस्ट आउटफिट असो किंवा ट्रेंडी हेअरस्टाईल, परफेक्ट लुकच्या शोधात मुली अवाढ्यव्य खर्च करतात. (Strong Nails Remedies: If you want long and beautiful nails, then get strong and shiny nails with these home remedies)

Strong Nails Remedies
Summer Nail Art Design : डायना, सोनाक्षीनेही ट्राय केले हे भन्नाट नेल आर्टचे डिझाईन!

ज्याप्रमाणे तुमचा मेकअप आउटफिट आणि हेअरस्टाईल तुम्हाला सुंदर बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, तशीच नखेही तुमच्या हातांच्या सौंदर्यात भर घालतात.

पण अनेकदा लांब आणि मजबूत नखे नसल्यामुळे आपल्या हातांचे सौंदर्य कमी होऊ लागते. जर तुम्हालाही अनेकदा याचा त्रास होत असेल. तर आज या लेखात आम्ही तुम्हाला काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही लांब, मजबूत आणि सुंदर नखे मिळवू शकता.

कँल्शियमची कमी भरून काढा

नखं नाजूक होऊन तुटतात तर त्यासाठी तुमच्या शरीरात असलेली कॅल्शियमची कमतरताही कारणीभूत असू शकते. यासाठी तुमच्या आहारात दूध, फळ, सोयाबिन, पालेभाज्या, मखाणे, सॅलेड यांच्या समावेश वाढवा. ज्यामुळे केवळ तुमची नखंच नाहीतर केसांचा रूक्षपणा, चेहऱ्यावरील पुरळ अशा अनेक समस्या दूर होतील. (Strong Nails)

Strong Nails Remedies
Nail Art : नखाची गाळणी...थेट चहा गाळण्याचा व्हिडीओ व्हायरल!

पेट्रोलियम जेली

आपण सर्व जण लहानपणापासून पेट्रोलियम जेली वापरत आलो आहोत. अनेकदा फाटलेले ओठ आणि त्वचेसाठी वापरली जाणारी पेट्रोलियम जेली नखे मजबूत करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे. आपले नखे मजबूत करण्यासाठी आणि चांगल्या वाढीसाठी आपण त्यावर पेट्रोलियम जेली लावू शकता. असे केल्याने नखे तुटण्याची समस्या कमी होते.

ऑलिव्ह ऑइल

जर तुमची नखे वारंवार तुटत असतील तर त्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईलचा वापर करू शकता. यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई नखांना पोषण देते. ऑलिव्ह ऑईल लावल्याने तुमची नखे मजबूत तर होतीलच, शिवाय लांबही होतील.

लिंबू

अन्नाची चव वाढवणारे लिंबू नखे मजबूत करण्यासही उपयुक्त ठरते. मजबूत आणि लांब नखे मिळविण्यासाठी आपण त्यावर लिंबू चोळू शकता. आठवड्यातून कमीत कमी 3 वेळा असे करणे फायदेशीर ठरेल. लिंबाने नखांची मालिश केल्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ करा. (Home Remedies)

Strong Nails Remedies
Black Toe Nail : पायांची नखं काळी पडणं धोक्याचं, असू शकतात 'या' गंभीर आजाराची लक्षणं

नारियल तेल

नारळाचे तेल आपल्या नखांसाठी देखील फायदेशीर ठरू शकते. दररोज नारळाच्या तेलाने नखांची मालिश केल्याने तुम्हाला 1 आठवड्यात परिणाम दिसू लागतील. याचा वापर केल्याने तुमची नखे मजबूत तर होतीलच, शिवाय ती चमकदारही होतील.

संत्र्याचा रस

व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असलेला संत्र्याचा रस नखे मजबूत करण्यासाठी देखील प्रभावी आहे. त्यासाठी एका भांड्यात संत्र्याचा रस घेऊन त्यात हात १० ते १५ मिनिटे बुडवून ठेवावे. त्यानंतर स्वच्छ पाण्याने हात धुवावेत.

नखं आपोआप सुधारतील फक्त हे टाळा

काही लोकांना दाताने नखे कुरतडण्याची सवय असते. काहीवेळा टेन्शन येत म्हणून तर काहीवेळा वेळ जात नसतो म्हणून नखं खाल्ली जातात. पण हे नखांसाठीच नाहीतर तुमच्या आरोग्यासाठीही धोकादायक आहे.

नखं खाल्ल्याने नखांचे आरोग्य तर बिघडतेच पण नखांची घाणही तोंडात जाऊ शकते. याने तुमचे आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे हे करणे टाळा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()