नात्यात प्रेम निर्माण होण्यासाठी एकमेकांच्या जवळ येणं खूप महत्वाचं ठरतं. किंबहुना तुमचे नातेसंबंध (Relation) घट्ट होण्यासाठी अशी जवळीक महत्वाची ठरते. पण शारीरिक जवळीक (Physical intimacy) साधण्यासाठी फक्त पुरूषच पुढाकार घेतात असा एक समज होता. पण नव्या अभ्यासानुसार आता महिलाही जवळीक साधण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेत असल्याचे स्प्ष्ट झाले आहे.
ग्लीडन या डेटींग अॅपने याबाबत सर्वेक्षण केले. त्यानुसार, 54 टक्के महिलांना जवळीक असताना पुढाकार घेताना आरामदायी वाटते. यात 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला आघाडीवर असून त्यांना अधिक आरामदायी वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. तर, 67 टक्के महिलांनी पुढाकार घेतल्याने आनंद मिळतो, असे स्पष्ट केले. असे स्पष्ट केले आहे की ते असे करण्यात आनंदी आहेत.
डेटिंग अॅप ग्लीडनच्या मते , ज्या ३३ टक्के महिलांना क्लिष्ट नातेसंबंधांमुळे त्रास झाला त्यांनी ब्रेकअपनंतर पुन्हा ऑनलाईन डेटिंग करायला सुरूवात केली आहे. प्रत्येक ग्राहकाप्रमाणे लिंगानुसार डेटा बदलतो. त्यानुसार या महिलांनी पसंतीनुसार 'sought relationship type' प्रोफाईलला पसंती दिली. त्यात पसंतीनुसार anything exciting साठी ८९ टक्के, शॉर्ट टर्म रिलेशनीशपसाठी ७५ टक्के तर आभासी सहवासाठी (virtual companionship) ८४ टक्के महिलांची पसंती होती. दिर्घकालीन नातेसंबंधासाठी ६७ टक्के महिलांनी पसंती दिली.
सर्वेक्षणानुसार डेटवर जाण्यासाठी एका व्यक्तीला निवडण्यासाठी त्या अशा व्यक्तीबरोबर किमान चार वेळा ऑनलाइन संवाद साधतात. आभासी संवाद कितीही वेळ साधता येतो. पण खऱ्या किंवा वास्तवीक आय़ुष्यात एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी तो सरासरी एक महिना टिकतो.
नात्यात येण्यासाठी जवळीक योग्य का?
अभ्यासानुसार त्या त्या व्यक्तीच्या लिंगानुसार याचे उत्तर आधारलेले आहे. यावेळी ६२ टक्के पुरूष आणि ७९ टक्के महिलांनी जवळीकता सर्वात महत्वाची आहे, असे निरिक्षण नोंदवले.
आधी जवळीक मगच सेक्स
७७ टक्के महिलांना डेटींगदरम्यान सुरूवातीला शारीरिक आवडींच्या गप्पांवर भर देण्यापेक्षा बौद्धिक संबंध किंवा गप्पा मारण्यात जास्त रस असतो. तर ९३ टक्के युझर्सच्या मते, यशस्वी विवाहासाठी जवळीक ही गुरूकिल्ली आहे. मात्र २७ टक्के लोकांकडे वेळ कमी असल्याने ते जवळीक कधी साधू शकले नाहीत, असे त्यांनी सांगितले तर ७२ टक्के लोकांना जोडीदारापासून दूर गेल्यासारखे वाटते आहे. युझर्सनी ते ग्लीजन डेटींग अॅप का वापरतात याविषयीही सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.