Success Story : शाळेत असताना आपल्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यात कधी पास,कधी नापास या गोष्टी होणारच. पण शिक्षक अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात. विद्यार्थ्यांच कौतुक झालं तर शिक्षकाचेही नावं मोठं होतं. त्यामुळे अपयशी होणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षक अगदी जीव तोडून शिकवतात.
आज आपण जिच्याबद्दल बोलणार आहोत तिच्या वाट्याला मात्र काही वेगळंच होतं. ही विद्यार्थीनी एका वर्षी फिजिक्समध्ये नापास झाली. तर, शिक्षक तिला तू शिकू नकोस, धुणी-भांडी कर, संसार सांभाळ असे म्हणायचे. त्याचवेळी तिने ते ऐकले नाही. तर त्या टोमण्यावर चिडून या मुलीने मन लावून अभ्यास केला. आणि आज ती धुणी-भांडी नाही. तर, इलेक्ट्रिक हायड्रोफॉइल बोट बनवत आहे.
या तरूणीचे नाव आहे, संप्रीती भट्टाचार्य ती कोलकाता येथील रहिवासी आहे. 36 वर्षीय संप्रीती नेव्हियरच्या संस्थापक आणि सीईओ आहेत. ही एक कंपनी आहे जी आपल्या नेव्हीयर 30 नावाच्या इलेक्ट्रिक हायड्रोफॉइल बोटीने सागरी उद्योगात क्रांती घडवत आहे. ही जगातील सर्वात लांब पल्ल्याची बोट आणि अमेरिकेची पहिली पूर्णपणे इलेक्ट्रिक हायड्रोफॉइलिंग बोट असल्याचा दावा केला आहे.
संप्रितीने सांगितले की, एक विद्यार्थी म्हणून मला भौतिकशास्त्राची आवड नव्हती. "मी हायस्कूलमध्ये गणितात अगदी सर्वोत्कृष्ट नव्हते, त्यामुळे शिक्षकांनी मला सांगितले की, तू घरकाम कर, शिक्षणाच्या नाद सोडून दे. पण मी जिद्दीन माझं शिक्षण पूर्ण केलं.
वयाच्या 20 व्या वर्षी मी 540 कंपन्यांमध्ये इंटर्नशिपसाठी अर्ज केला आणि 540 ईमेल पैकी अमेरिकेतील केवळ एका भौतिकशास्त्र प्रयोगशाळेत मला नोकरी मिळाली. फक्त चार जणांनी प्रतिसाद दिला. मग शेवटी मला एकच नोकरी मिळाली आणि ती म्हणजे फर्मिलॅबमध्ये इंटर्नशिप.”
यानंतर संप्रितीने Research assistant म्हणून शिकागोला गेली. मी विज्ञानाच्या प्रेमात पडले होते. मी नासासोबत आणखी एक इंटर्नशिप केली. त्यानंतर मी ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीमधून पदव्युत्तर पदवी आणि एमआयटीमधून पीएचडी पदवी मिळवली. त्यानंतर मी सॅन फ्रान्सिस्कोला गेली, आणि बोट तयार करण्यासाठी एक टीम नियुक्त केली.
2016 मध्ये, मला फोर्ब्सने जगातील सर्वात 30 शक्तिशाली तरुण यशस्वी महिलांपैकी एक म्हणून समाविष्ट केले. ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती.
“गेल्या 13 वर्षांत मी खूप काही शिकले आहे, ज्यामुळे मला कोणत्याही प्रकारच्या कठीण समस्यांना तोंड देण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे. मग ते अणुभट्टीची रचना असो किंवा उड्डाण नियंत्रक तयार करणे किंवा ही उडणारी बोट तयार करणे असो, हे सगळं मी अगदी लिलया करू शकते.
फ्लाइंग बोटची खासियत
Navier 30 मध्ये विमानासारखी रचना आहे आणि तीन पाण्याखालील पंख आहेत. जेव्हा बोट पुरेशी वेगाने जाते तेव्हा वारा तिला लाटांच्या वर उचलतो. त्यामुळे ते जलद आणि अधिक ऊर्जा कार्यक्षम तर आहेच, पण त्यामुळे नौकानयन सोपे आणि जवळजवळ नीरवही होते. स्टार्टअप N30 ला “द बोट ऑफ द फ्युचर” असे टोपणनाव देण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.