Success Story : 12 वी नापास व्यक्ती यशस्वी होईल का? प्रश्नाच सणसणीत उत्तर दिलं मुरलीनं, उभारली कोट्यावधीची कंपनी!

मुरली दिवी यांच्या संघर्षाची कहाणीही नक्कीच वाचा
Divis laboratory owner murali divis success story
Divis laboratory owner murali divis success story esakal
Updated on

Success Story : अभ्यासात असणारी मुलं नेहमी कौतुकास पात्र ठरतात. अन् नापास मुलं नेहमीच टिकेचे धनी होतात. 10 - 12 वी सारख्या बोर्ड परिक्षेत नापास झालेला विद्यार्थी आयुष्यात काहीच करू शकत नाही असेच त्यांना वाटते. पण फार कमी लोकांनाच स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळते. त्यापैकीच एक आहे मुरली दिवी?

मुरली जेव्हा बारावीत दोनदा नापास झाला. तेव्हा त्यांचा आत्मविश्वास डळमळू लागला. जे काही उरलेलं धाडस होतं ते मित्र आणि नातेवाईकांच्या टोमण्यांनी नष्ट केले. मात्र, लहानपणापासूनच त्यांनी इतक्या अडचणींचा सामना केला होता की, या काळातही त्यांनी स्वत:चा धीर कधीही सोडला नाही.

Divis laboratory owner murali divis success story
Success Story : 14 वर्षांच्या रियाचे 11 देशांत जादूचे प्रयोग

वर्षानुवर्षे केलेले अथक परिश्रम आणि जिद्द शेवटी यशाच्या शिखरावर पोहोचते. मुरली दळवीच्या या प्रयत्नाला फळ मिळाले आणि 12 वीत नापास झालेल्या या व्यक्तीने 1.3 लाख कोटी रुपयांची कंपनी उभारली आहे.

कोण आहेत मुरली दिवी?

अग्रगण्य फार्मा कंपनी Divis Labs ची औषधे तुम्हाला आसपास कुठेही मिळतील. या कंपनीचे फार्मा क्षेत्रात मोठे नाव आहे. कंपनीचे मार्केट व्हॅल्यू 1.3 लाख कोटी रुपये आहे. या कंपनीचे संस्थापक मुरली दिवी यांच्या संघर्षाची कहाणीही तितकीच प्रेरणादायी आहे. (Business Idea)

Divis laboratory owner murali divis success story
Nirma Success Story: मुलीच्या निधनानंतर तिच्या नावानं वडिलांनी उभारली कंपनी..उलाढाल गेली ७ हजार कोटींवर

मुरली यांनी जितका संघर्ष केला, तितकेच त्यांचे यश बहरून आलेले दिसते. 10 हजार रुपयांच्या नोकरीवर 14 लोकांचे कुटुंब चालवणे सोपे नव्हते. त्यांचे बालपण आंध्र प्रदेशातील एका छोट्या गावात गेले. वडील एक सामान्य कर्मचारी होते. पगार कसा तरी जगेल इतकाच होता. एकेकाळी एक वेळ जेवून झोपायचा मुरली आज शेकडो लोकांना नोकऱ्या देत आहे.

500 रुपये घेऊन अमेरिका गाठली

तो अभ्यासात फारसा हुशार नव्हते. बारावीत दोनदा नापास झाले होते. पण अपयशानंतरही हार मानली नाही. 1976 मध्ये केवळ 500 रूपये घेऊन मुरली अमेरिकेला गेले. अमेरिकेला जात असताना त्यांच्या खिशात फक्त 500 रुपये होते.

तिथे त्यांना फार्मासिस्टची नोकरी मिळाली. पहिल्या नोकरीत त्यांना फक्त 250 रुपये पगार मिळाला. कमी पगारातही मुरली टिकून राहिले. आणि काही वर्षांत त्यांनी $65000 म्हणजेच सुमारे 54 लाख रुपये जमा केले. त्यांनी केवळ सेव्हिंग्ज केले नाहीतर, त्यांनी त्या कंपनीतून फार्मा क्षेत्राचा जवळून अभ्यास केला. त्यानंतर ते भारतात परतले. (Success Story

Divis laboratory owner murali divis success story
Success Story: मुंबईतल्या चाळीत राहणाऱ्या माणसाने दुबईत बनवली सर्वात महागडी इमारत; पण ही व्यक्ती अदानी-अंबानी नाही तर...
Divis Laboratory ची भव्य इमारत
Divis Laboratory ची भव्य इमारत esakal

भारतात व्यवसाय सुरू केला

आपली आयुष्यभराची बचत गुंतवून त्यांनी 1984 साली फार्मा क्षेत्रात सुरुवात केली. त्यांनी कलम अंजी रेड्डी यांच्यासोबत काम केले. त्यांनी मिळून केमिनोरची स्थापना केली, जी 2000 मध्ये डॉ रेड्डीज लॅबोरेटरीजमध्ये विलीन झाली. डॉ. रेड्डीजसोबत 6 वर्षे काम केल्यानंतर मुरलीने दिवीच्या लॅब सुरू केल्या.

1995 मध्ये, मुरली यांनी चौतुप्पल, तेलंगणा येथे आपले पहिले उत्पादन युनिट स्थापन केले. त्यानंतर एकामागून एक प्लांट येऊ लागली. 2002 मध्ये कंपनीने दुसरे युनिट सुरू केले. मार्च 2022 मध्ये कंपनीने 88 अब्ज रुपयांची कमाई केली. आज कंपनीची किंमत 1.3 लाख कोटी रुपये आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.