Plastic Waste पासून तयार केले फॅशनेबल कपडे, बाप-लेकाने उभारली १०० कोटींची कंपनी

तामिळनाडूमधील के. शंकर आणि त्यांचा मुलगा सेंथिल शंकर यांनी श्री रेंगा पॉलिमर्स ही कंपनी सुरु केली असून या कंपनीत दररोज १५ लाख प्लास्टिकच्या बाटल्या Plastic Bottles रिसायकल केल्या जातात
प्लास्टिक पासून कपडे
प्लास्टिक पासून कपडेEsakal
Updated on

जर एखाद्या टाकावू वस्तू पासून किंवा कचऱ्यात Garbage टाकण्यात आलेल्या प्लास्टिकपासून कोटींच्यावधींचा बिझनेस उभारणं शक्य आहे असं कुणी म्हंटलं तर कदाचित कुणाचा विश्वास बसणार नाही. मात्र तामिळनाडूमधील एका बाप-लेकाच्या जोडीने हे शक्य करून दाखवलं आहे. Success Story of Tamil Nadu K Shankar making clothes from plastic Waste

कचऱ्यात टाकण्यात येणारं प्लास्टिक रिसायकल Plastic Recycle करून या पिता-पूत्राच्या जोडीने १०० कोटींची कंपनी उभारली आहे. तामिळनाडूमधील के. शंकर आणि त्यांचा मुलगा सेंथिल शंकर यांनी श्री रेंगा पॉलिमर्स ही कंपनी सुरु केली असून या कंपनीत दररोज १५ लाख प्लास्टिकच्या बाटल्या Plastic Bottles रिसायकल केल्या जातात.

या रिसायकलिंग व्यवसायातूनच के. शंकर यांचा मुलगा सेंशिल शंकर यांना एक नवी कल्पना सुचली.

प्लास्टिकच्या बाटल्या वापरल्यानंतर कचराकुंडी आणि त्यानंतर डंम्पिंग ग्राऊंडमध्ये पोहचतात. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. हे प्रदूषण Pollution रोखण्यासाठी सेंथिल यांना एक नवी कल्पना सुचली. त्यांनी कचऱ्यातील प्लास्टिक बाटल्यांपासून फॅब्रिक म्हणजेच कापड तयार करून फॅशनेबल कपडे तयार करण्याचा निर्णय घेतला.

EcoLine नावाने त्याचा कपड्यांचा ब्रँण्ड असून. यामध्ये रिसायकल प्लास्टिकचं कापड वापरण्यात येतं.

प्लास्टिक रिसायकलिंगसाठी कंपनी केली सुरू

के. शंकर यांनी IIT मधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर परदेशात अनेक वर्ष नोकरी केली. २००८ सालामध्ये ते भारतात परतले आणि त्यांनी प्लास्टिक वेस्टवर काम करण्यास सुरुवात केली. Shree Renga Polymers या कंपनीची स्थापना करून ते प्लास्टिक रिसायकलिंगचं काम करू लागले.

प्लास्टिक पासून कपडे
plastic use : प्लॅस्टिकच्या अतिवापरामुळे वंध्यत्व येऊ शकतं, हे माहिती आहे का?

प्लॅस्टिकपासून फॅशनेबल कपडे

के.शंकर यांचा मुलगा सेंथिल देखील वडिलांसोबत कंपनीचं काम पाहत होत. त्यानंतर सेंथिंल यांनी प्लास्टिक रिसायकलिंगमध्ये एक पाऊल पुढे टाकलं. रिसायकल बॉटल्सपासून त्यांनी कापड तयार केलं. या तयार कापडासोबतच त्यांनी कपडे तयार करून त्याची विक्री करण्यासाठी ब्रॅण्डची निर्मिती केली.

कंपनीने पेट बॉटल्स, क्रश आणि तुटलेल्या बॉटल्स गोळा करण्यास सुरुवात केली. ५० हजार लोकांकडून त्यांनी प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या जमा करून त्यापासून रंगीत कापड तयार केलं. त्यापासून टी-शर्ट, पॅन्ट आणि ब्लेझर तयार करण्यात आले. इकोलाईन या नावाने या कपड्यांची विक्री केली जाते.

मोंदींकडूनही झालं कौतुक

एक शर्ट तयार करण्यासाठी ८ बाटल्या वापरल्या जातात. तर २० बाटल्यांपासून एक जॅकेट तयार करण्यात येतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या पर्य़ावरण पूरक ब्रॅण्डला प्रोत्साहन देण्यासाठी फेब्रुवारी महिन्यामध्ये संसदेत इकोलाइन ब्रॅण्डचं जॅकेट परिधान केलं होतं. हे जॅकेट २५ प्लास्किटच्या बाटल्या रिसायकल करून तयार करण्यात आलं होतं. परदेश दौऱ्यावरही मोदींनी हे जॅकेट घातलं होतं.

१२ कोटींचा टर्नओव्हर

इकोलाइन ब्रॅण्डच्या कपड्यांची रेंज अवघ्या ५०० रुपयांपासून सुरू होते. ६००० रुपयांपर्यत ही प्रोडक्ट रेंज आहे. महिन्याला तब्बल २० हजार ऑर्डरच्या माध्यमातून ते वर्षाला १२ कोटींचा टर्नओव्हर करत आहेत.

महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तरप्रदेश आणि आंध्रप्रदेश या राज्यातून त्यांच्या प्राॅडक्टला मोठी मागणी आहे. वेबसाईटवरूनही ते कपड्यांची विक्री करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()