Success Story : पुणेरी लोकांची बातच न्यारी आहे. तोंडाने थोडे फटकळ वाटत असले तरी फणसाच्या गरासारखा गोडवाही त्यांच्यातच जास्त आहे. केवळ स्वभावानेच नाहीतर बुद्धिमत्तेच्या बाबतीतही पुणेरी लोकांचा हात कोणीही धरू शकत नाही.
याचीच प्रचिती एका तरूणीला पाहुन येते. परदेशात जाऊन अनेक भारतीयांनी आपल्या यशाची पताका फडकवली आहे. अशीच एक भारतीय वंशाची महिला म्हणजे नेहा नारखेडे होय. तिची अमेरिकेतील सर्वात यशस्वी महिला म्हणून गणना केली जात आहे.
पुण्यात जन्मलेल्या नेहाचे नाव आज तंत्रज्ञान क्षेत्रात यशस्वी झालेल्या महिलांच्या यादीत आले आहे. फोर्ब्सच्या यादीत अमेरिकेतील श्रीमंत महिलांमध्ये नेहाने स्थान पटकावले आहे.
नेहाची संपत्ती 75 हजार कोटी रुपये आहे
नेहा ही कॉन्फ्लुएंट नावाच्या सॉफ्टवेअर कंपनीची बोर्ड सदस्य आणि सह-संस्थापक आहे. कंपनीची मार्केट व्हॅल्यू $9.1 अब्ज आहे. जी भारतीय रुपयात अंदाजे 75 हजार कोटी इतकी आहे. ही एक क्लाउड सेवा पुरवणारी कंपनी असून यात नेहाची ६ टक्के भागीदारी आहे. नेहाच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर ती अंदाजे 520 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 42 हजार कोटी रुपये आहे. (Software)
नेहा मुळची पुण्याची आहे. तिचा जन्म पुण्यात झाला. पुण्यातच तिचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले. यानंतर ती पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेला गेली. त्यानंतर नेहाने ओरॅकलमध्ये टेक्निकल विभागात दोन वर्षे काम केले. यानंतर ती लिंक्डइनसोबत काम करू लागली.
वर्षभरानंतर तिची बढती झाली. यानंतर नेहाला सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर हे पद देण्यात आले. तिची कामाप्रती असलेली निष्ठा पाहून वर्षभरानंतर नेहाला पुन्हा बढती मिळाली. नेहाला प्रिन्सिपल सॉफ्टवेअर इंजिनीअर हे पद देण्यात आले. नेहाला अशीच बढती मिळत गेली अन् ती स्ट्रीम इन्फ्रास्ट्रक्चर बनली. (Womens success story)
नेहा आणि तिच्या दोन सहकाऱ्यांनी 2014 मध्ये लिंक्डइनची नोकरी सोडली. यानंतर तिघांनी मिळून कॉन्फ्लुएंट नावाची कंपनी सुरू केली. नेहाने त्या कंपनीची मुख्य तंत्रज्ञान आणि उत्पादन अधिकारी म्हणून पाच वर्षे राहिल्या. आता ती कंपनीची बोर्ड मेंबर आहे. यासोबतच 2021 मध्ये नेहाने ऑसिलेटर नावाची दुसरी कंपनी सुरू केली.
नेहाला ही जागा सहजासहजी मिळाली नाही. प्रदीर्घकाळाचा संघर्ष आणि अनेक चढउतारानंतर नेहा हे स्थान मिळवले आहे. याआधी 2021 मध्ये नेहा ही 8 वी श्रीमंत भारतीय महिला होती. त्याच वर्षी त्यांच्या कंपनीचा IPO आला, त्यानंतर त्यांची नेट वर्थ प्रचंड वाढली.
फोर्ब्सच्या माहितीनुसार, नेहाची 2019 मध्ये एकूण संपत्ती 360 कोटी डॉलर होती. 2020 मध्ये 600 कोटी, 2021 मध्ये ते 925 कोटी डॉलर झाले. 2022 मध्ये तिची संपत्ती 490 कोटी डॉलरवर आली. सध्या नेहाची एकूण संपत्ती 520 कोटी डॉलर्स म्हणजे सुमारे 4268 कोटी रुपये आहे.
नेहा तिच्या यशाचे श्रेय वडिलांना देते. तीने सांगितले की, लहानपणापासून त्यांचे वडील त्यांच्यासाठी इंदिरा गांधी, किरण बेदी, इंद्रा नूयी यांसारख्या महान व्यक्तींची पुस्तके आणत असत. त्यांची पुस्तके वाचूनच मला जीवनात काहीतरी करून दाखवायचंय असं वाटत होतं. मी मोठी होईन तशी हे विचार मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाले. फॅमिलीच्या सपोर्टमुळेच मी इथवर पोहचू शकले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.